बामणोद येथे दिव्यांग सेनेची स्थापना*.. शाखाध्यक्षपदी राजू (महात्मा) सोनवणे तर उपाध्यक्षपदी घन: श्याम फिरकले यांची निवड



*बामणोद येथे दिव्यांग सेनेची स्थापना*.. शाखाध्यक्षपदी राजू (महात्मा) सोनवणे तर उपाध्यक्षपदी घन: श्याम फिरकले यांची निवड


 जळगाव दि.०७ (प्रतिनिधी)बामणोद ता.यावल येथे दिव्यांग सेना (सामाजिक संघटना)  शाखेचे फलक अनावरण सरपंच राहुल तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन सर यांनी राजू (महात्मा) सोनवणे बामणोद अध्यक्ष, घन:श्याम फिरके उपाध्यक्ष, कविता सोनवणे सचिव,संतोष सोनवणे सहसचिव, जितेंद्र तायडे कार्याध्यक्ष, चंचल कोल्हे सह कार्यध्यक्ष, धनराज सोनवणे संघटक प्रमुख, रामकृष्ण सोनवणे प्रसिद्धीप्रमुख, सिद्धांत केदारे सल्लागार  यांना नियुक्तीपत्र देऊन यांची निवड केली. 

सर्वात प्रथम दिव्यांग सेना यावल तालुका योगेश उर्फ मुन्ना चौधरी यांनी मनोगत व्यक्त करून दिव्यांग सेनेच्या कार्याबद्दल माहिती दिली. जिल्हाध्यक्ष यांनी  दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची तसेच स्मार्ट कार्ड, दिव्यांग कल्याणकारी 5 टक्के निधी, अंत्योदय योजना, याबद्दल माहिती दिली त्यावेळेस त्यांनी सांगितले की सर्वांनी एकजुटीने येऊन काम करा.सोपान बादशहा पं. स. यावल यांनी दिव्यांग बांधवांना बचत गटा बद्दल माहिती दिली. यावेळेस राहुल कोल्हे दिव्यांग सेना जिल्हा सल्लागार, विशाल दांडगे सामाजिक कार्यकर्ते,नितीन महाजन दिव्यांग सेना फैजपूर शहर अध्यक्ष.तथा सं.गा. यो समिती सदस्य यावल,अशोक कोळी दिव्यांग सेना यावल तालुका उपाध्यक्ष, चेतन तळेले दिव्यांग सेना यावल तालुका सचिव, चिराग पाटील यावल तालुका संघटक प्रमुख, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज सोनवणे यांनी केले, या कार्यक्रमाला  सर्व दिव्यांग बंधू भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने