साकळी येथे दोन बंद घरांचा कडीकोंडा तोडून ..दीड लाखांचा ऐवज पोबारा..गावात भितीचे वातावरण

 


साकळी येथे दोन बंद घरांचा कडीकोंडा तोडून ..दीड लाखांचा ऐवज पोबारा..गावात भितीचे वातावरण

मनवेल  ता.यावल दि.०७(प्रतिनिधी गोकुळ कोळी )साकळी  येथे सोमवारी दोन बंद घरात घरफोडी झाल्याचे उघडकीस आलेली असून एका घरात रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह जवळपास दीड लाख रुपयाची जबर चोरी झाल्याचे निदर्शनास आले असून सदर घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे .चोरीच्या घडलेल्या घटनेबाबत नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून गावात पोलिसांची गस्त वाढवण्यात येईल अशी मागणी केली जात आहे.

       याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, साकळी गावातील बोरसे वाडा भागातील रहिवाशी तथा माजी सैनिक भास्कर चिंधु नेवे हे गेल्या आठवड्या पासुन आपल्या पत्नीसह एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त आपल्या मुलीकडे बऱ्हाणपूर येथे गेलेले होते.दरम्यान आज दि.७ रोजी सकाळच्या दरम्यान नेवे यांच्या घराच्या समोरच्या मुख्य दाराच्या लोखंडी व लाकडी दरवाज्यांचे कुलूप तोडून ते तोडलेली कुलूपे त्यांच्या ओट्यावर तुळशी वृंदावन जवळ ठेवलेले परिसरातील रहिवाशी नागरिकांच्या दृष्टीस पडले.तेव्हा हा चोरीचा प्रकार आहे का ? अशी नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली.  त्यांनी तात्काळ श्री.नेवे यांना घटनेबाबत कळविले. घटनेची माहिती कळताच नेवे लगेच घरी परतले. घरी आले असता त्यांच्या दुमजली घराचा पुढील दरवाज्यांचे उघडा दिसला व कुलूप तोडलेले दिसले. तेव्हा लागलीच भास्कर नेवे यांनी चोरीच्या घटनेबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घरात आत प्रवेश करून पाहिले असता. घरातील संसार उपयोगी साहीत्य, कपडे,गाद्या,सुटकेसी आदी सामान अस्ताव्यस्त पडलेले होते तर कपाट उघडे होते व  कपाटातील सामान सुद्धा फेकलेला होता. तसेच घरातील माळयावरील मजल्यावरील घरातील साहीत्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसले.तसेच दुसऱ्या मजल्यावरील खोलीची सुद्धा कुलूप तोडून त्याठिकाणी सुद्धा सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. तेव्हा त्यांनी कपाटात ठेवलेले रोख ३० हजार रूपये पाहिले असता ते जागेवर नव्हते तसेच घरात डब्यामध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र व चांदीचे दागीने सुद्धा चोरीस गेल्याचे दिसुन आले. सदर चोरीच्या घटनेत एकुण ३० हजारांची रोकड सह सोन्या,चांदीचे १ लाख २० हजार रूपये किंमतीचे दागीने अज्ञात चोरांकडून चोरीस गेल्याचे निर्दशनास आले. त्याच प्रमाणे दुसऱ्या एका चोरीच्या घडलेल्या घटनेत गावातील कुंभार वाडा भागातील अवसु झावरू कुंभार यांच्या बंद घरात देखील घरफोडी झाली असल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी घरच्यांच्या लक्षात आले.त्यांच्या घरातील धान्याच्या कोठीत ठेवलेले एक हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लाबंवली आहे. या दोघं घटनांबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली असता घटनास्थळी पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार, हवालदार चंद्रकात पाटील आदी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.गावात एकाच दिवशी दोन ठिकाणी बंद घरात घरफोडी झाल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे गावात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने