दुर्बडया माध्यमिक विद्यालयात मोफत सायकलीचे वाटप..पुणे येथील'युवकमित्र परिवार'संस्थेचा 'सायकल बँक' उपक्रम
शिरपूर दि.१३(प्रतिनिधी):दुर्बडया ता.शिरपूर येथील आई बीजासनी माता माध्यमिक विद्यालयात मोहिदा,उमर्दे,निमबारी,काळापाणी येथून शाळेत येणाऱ्या ४० विद्यार्थ्यांना युवकमित्र परिवार संस्थेच्या 'सायकल बँक'उपक्रमातंर्गत मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी एस.सी.पवार हे होते तर उदघाटक म्हणून माजी समाजकल्याण सभापती वसंत पावरा हे होते.प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख के.व्ही.भदाणे, संस्थेचे सचिव विनोदशेठ सोनार, अनिल राजपूत, युसूफ तेली,दिनेश पावरा हे होते.
युवकमित्र परिवार या संस्थेतर्फ पुणे व मुंबई शहरात जुन्या सायकलीचे संकलन केले जाते व या सायकली दुरुस्त करून ग्रामीण भागातील लांब दूरवर असलेल्या शाळांमध्ये पायी जाणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना सायकल बँक उपक्रमानंतर्गत मोफत वाटप केले जाते.सदर सायकल मिळवणेकामी शाळेचे शिक्षक अरविंद पाटील यांनी संस्थेकडे सायकलीची मागणी केली होती तर मुख्याध्यापक नचिकेत पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.यावेळी विद्यार्थ्यांना मोफत सायकली मिळाल्याने शाळेत नियमित ये जा करण्यास सायकलीची मदत होणार असून शालेय जीवन सुखकर होणार असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नचिकेत पवार यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक अरविंद पाटील, अमोल सोनार,जगदीश पाटील,गोपाल सोनार,भिकेश पावरा,सुनंदा बडगुजर,गायत्री पाटील, मोहिनीराज पाटील,संदीप देवरे,श्रीराम जाधव यांचे सहकार्य लाभले.
चौकट
......................................................................................
लांब दुरवर शाळेत जाणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी 'सायकल बँक'उपक्रम
- ग्रामीण आणि दुर्गम भागातील गावापासून लांब दूरवर असलेल्या शाळांमध्ये नियमित पायी जाणाऱ्या अत्यंत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप केली जाते.सर्व सायकली ह्या पुणे व मुंबई शहरातील नागरिकांनी दान केलेल्या जुन्या परंतु दुरुस्त केलेल्या टिकाऊ सायकल असतात.आजअखेर संस्थेतर्फ पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप झाले असून एक हजार सायकल वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे.
-प्रवीण महाजन [अध्यक्ष युवकमित्र परिवार,पुणे]
.....................................................................................