प्राचार्य प्रा. डॉ अविनाश ढाके यांचै चोपडा फॉर्मसी कॉलेजात व्याख्यान
चोपडा दि.१३ ( प्रतिनिधी) : महात्मा गाँधी शिक्षण मंडळाचे श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे G-Patसेल अंतर्गत G-Pat २०२२ या पदव्युत्तर एम फार्म प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेसाठी अनुभवी मार्गदर्शक प्रा. डॉ अविनाश ढाके प्राचार्य एस एम बी टी कॉलेज ऑफ फार्मसी धामणगाव जिल्हा नाशिक यांचे लेक्चर सिरीज नुकतेच आयोजित करण्यात आलेले होते. या लेक्चर सिरीज मध्ये प्रा.डॉ ढाके सर यांनी फार्मसीतील सर्वात कठीण विषय असलेला फार्माकेमिस्ट्री अगदी सोप्या आणि सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांना समजवून सांगितले. श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडा येथे पदव्युत्तर एम फार्म फार्मासुट्टीक्स आणि एम फार्म फार्माकोग्नोसी विषयातील अभ्यासक्रम पायाभूत संशोधन सुविधांसह तसेच तज्ञ मार्गदर्शनासह उपलब्ध आहेत महात्मा गाँधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड संदीप सुरेश पाटील आणि सचिव डॉ.सौ स्मिताताई संदीप पाटील यांच्या प्रोत्साहन पूर्वक मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य प्रा डॉ गौतम वडनेरे यांच्या मार्गदर्शनानुसार जी पॅट सेल हा जी पेट 2022 च्या मुख्य उद्देश ठेवून कार्यान्वित करण्यात आले आहे.