चोपडा फार्मसी कॉलेजात पोस्टर मेकिंग स्पर्धा आणि घोषवाक्य लेखन स्पर्धा संपन्न


चोपडा फार्मसी कॉलेजात  पोस्टर मेकिंग स्पर्धा आणि घोषवाक्य लेखन स्पर्धा संपन्न

चोपडा दि.१३ (प्रतिनिधी)महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, चोपडा.जि. जळगाव येथे 8 मार्च रोजी  "Women in leadership : Achieving an equal future in Covid world" या विषयावर पोस्टर मेकिंग स्पर्धा आणि 

 "Gender Equality Today for a Sustainable Tomorrow" या विषयावर घोषवाक्य लेखन स्पर्धा आयोजित करून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्ष अॅड.भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा सौ.आशाताई पाटील, सचिव सौ.डॉ.स्मिताताई संदीप पाटील, प्राचार्य डॉ.गौतम पी वडनेरे व रजिसस्टार प्रफूल्ल बी मोरे यांच्या  मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण समिती व युवती सभा समितीच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  प्राचार्य डॉ.गौतम पी वडनेरे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली त्यामध्ये पोस्टर स्पर्धेत प्रथम पारितोषिक हर्षल पी मोरे आणि कुणाल सोनवणे, द्वितीय पारितोषिक सृष्टी बेलदार, तृतीय पारितोषिक तेजल पाटील आणि त्याचप्रमाणे घोषवाक्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक किर्ती आर नेवे, द्वितीय पारितोषिक हरीश आर गोसावी आणि तृतीय पारितोषिक तन्मय आर चौधरी आणि हर्षल पाटील यांनी पटकावले. समितीच्या प्रमुख सौ.क्रांती डी.पाटील व सर्व महिला समिती सदस्या सौ.सुवर्नलता एस.महाजन, सौ.प्रेरणा जाधव, सौ.प्रियांका जैन, मिस आकांशा पाटील, मिस योगिनी सोनवणे, सौ. कांचन पाटील यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  पुढाकार घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने