चोपड्यात महाविकास आघाडी सरकारचा निषेध

 


चोपड्यात महाविकास आघाडी सरकारचा निषेध

चोपडा दि.१३(प्रतिनिधी):महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा गैरवापर करत मुंबई पोलीसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली. अधिवेशन काळात फडणवीस साहेबांनी अनेक आजी माजी मंत्र्याचे काळे कारनामे अगदी पुरावे सहीत विधानसभा अध्यक्षाकडे सुपूर्द केले. त्याच्याच राग म्हणून महाविकास आघाडी सरकार ने पोलीसांना हाताशी धरून सुडबुद्धीने नोटीस बजावली त्या नोटीसचे चोपडा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात होळी करण्यात आली.तसेच आघाडी शासनाविरुध्द जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

   यावेळी  तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील,युवा मोर्चा ता अध्यक्ष प्रकाश पाटील,जिल्हा चिटणीस रंजनाताई नेवे,व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे,जेष्ठ नेते अॅड एस डी सोनवणे,पं स सदस्य भरत बाविस्कर,शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील,सरचिटणीस हेमंत जोहरी,मनोहर बडगुजर, सुनिल सोनगिरे,ओबीसी तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील,बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा सदस्य लक्ष्मण पाटील, रणछोड पाटील, शेखर सोनार

 धिरज सुराणा, पंडीत पाटील,ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रविण चौधरी,बुथ सहयोजक विजय बाविस्कर, धर्मदास पाटील, अनिल बोरसे, हिरालाल पाटील,रूपेश पाटील, अरूण गोकुळ पाटील, अंबादास बडगुजर आदि उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने