*चऱ्होली भोसरी येथे दिव्यांग प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन..पिंपरी चिंचवड चे माजी महापौर नितीन काळजे यांच्या वरद हस्ते झाला शुभारंभ*
पुणे दि.१३ (प्रतिनिधी) 'झुंज'दिव्यांग संस्था मार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी चऱ्होली व भोसरी येथे प्रशिक्षण केंद्रांचे उदघाटन पिंपरी चिंचवड चे माजी महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
दिव्यांग व्यक्तींना स्वतः च्या पायांवर स्वतः चे विश्व निर्माण करता यावे हा मुख्य उद्देश ठेवून झुंज'दिव्यांग संस्थेमार्फत अपंग बांधवांना मोफत मोबाईल रिपेरिंग ,सलून,अगरबत्ती प्रशिक्षण देण्यात येणार आहे.करिता यावेळी संस्थेला 3 कॉम्पुटर,मोबाईल रिपेरिंग सेट भेट देण्यात आले.