महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९८८च्या बॅचचे १०वी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर
लासूर ता.चोपडादि.२७(वार्ताहर) येथिल किसान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सन 1988 मधील 10 वी च्या वर्गातील मित्रांचे गेट टूगेदर येथिल श्री क्षेत्र नाटेश्वर मंदिर येथे उत्साहात संपन्न झाले . सुरवातीला सर्व वर्ग मित्रांनी आपला परीचय देवून जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी हर्षल पाटील,सतीश जैस्वाल, कैलास बाविस्कर, डॉ राजेंद्र महाजन, दिलीप पालीवाल, बापू चौधरी, राजेश महाजन, मधुकर माळी, नवल मगरे,संजय पाटील, विनोद भाऊसाहेब, राजेंद्र वाघ, दिलीप जैन,संजय कापडणे, पुर्णानंद वारडे.,भास्कर अहिरे, उत्तम बागूल, सुरेश माळी ,सौ.मिनाबाई थोरात यांच्या सह सर्व वर्ग मित्रांनी आपला जुन्या आठवणींना उजाळा दिला. लासूर येथिल दहावीचे परीक्षा केंद्र हि 1988 पासूनच सुरू झाले होते तब्बल 37 वर्षांनी सर्व वर्ग मित्रांची भेट झाल्यामुळे वेगळाच आनंद होता तसेच आगामी काळात मोठ्या संख्येने बाकीच्या सर्व वर्ग मित्रांना पण आमंत्रित करून मोठा कार्यक्रम घेण्यात येईल असे ह.भ.प.बापू चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले
