वडगाव - चांदणी रस्त्यावर भरधाव ट्रकची मोटरसायकलला ठोस तरूणाचा जागीच मृत्यू

 वडगाव - चांदणी रस्त्यावर भरधाव ट्रकची  मोटरसायकलला ठोस  तरूणाचा जागीच मृत्यू

चोपडा दि.३०(प्रतिनिधी) :  तालुक्यातील वडगाव-चांदसणी रस्त्यावर  पशु वैद्यकीय दवाखान्यासमोर  दुपारी तीन वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत १९ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दूर्दैवी घटना घडली.अपघातातील मयताचे नाव आकाश ज्ञानेश्वर पाटील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

वडगाव-चांदसणी रस्त्यावरुन आर.जे.40 जी.ए.4196 क्रमांकाची ट्रक महामार्गावर भरधाव वेगाने जात असताना महामार्गावरुन प्लॉट भागाकडे जाणाऱ्या मोटारसायकल क्रमांक (एम.एच.19 एन.5979) वरील आकाश ज्ञानेश्वर पाटील ला ट्रकने अडावद पशु वैद्यकीय दवाखान्यासमोर जबर धडक दिली.जबर धडकेने आकाशचा जागीच मृत्यू झाला. आजूबाजूला रस्ता वापरणाऱ्या इतरांनी आरडाओरड केल्याने ट्रकचालक ट्रक सोडून पसार झाला. हा अपघात इतका भीषण होता की, युवकाच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच अडावदचे हवालदार सुनील तायडे, शेषराव तोरे, किरण शिरसाठ, फिरोज तडवी, भूषण चव्हाण, प्रदीप पाटील, जयदीप राजपूत, विजय बच्छाव, अक्षय पाटील, दिलीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. बातमी लिहीपर्यंत पुढील कारवाई सुरू होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने