चोपडा शहराला नंदनवन करावयाचे असल्यास प्रत्येकानं एक तरी झाड लावा.. मुख्याधिकारी रामनिवास झवंर ♦️"माझी वसुंधरा" अभियानांतर्गत श्रीराम नगरात वृक्ष लागवड..

 

चोपडा शहराला नंदनवन करावयाचे असल्यास प्रत्येकानं एक तरी झाड लावा.. मुख्याधिकारी रामनिवास झवंर

♦️"माझी वसुंधरा" अभियानांतर्गत  श्रीराम नगरात वृक्ष लागवड..  



चोपडा दि.३०(प्रतिनिधी) : चोपडा नगरपरिषद ही माझी वसुंधरा 6.0 स्वच्छ सर्वेक्षण 2025 अभियानाची जोरदार प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. त्याअनुषंगाने श्रीराम नगर कॉलनी परिसरातील नागरीकांच्या सहयोगाने दि.29/10/2025 रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याधिकारी श्री.रामनिवास झंवर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.पर्यावरण संवर्धन, हरितक्रांती व स्वच्छ चोपडा अभियानाच्या उपक्रमांतर्गत ही वृक्ष लागवड करण्यात येत आहे 

 या वेळी मुख्याधिकारी श्री.रामनिवास झंवर यांनी आवाहन केले की, चोपडा शहरास हरित व नंदनवन करायचं असेल तर प्रत्येक नागरीकाने प्रत्येकी 1 झाड लावुन वसुंधरा व पर्यावरण संरक्षणास सहकार्य करावे. तसेच केवळ झाड न लावता त्याचे योग्य संगोपण व संवर्धन करावे जेणेकरुन पर्यावरणाची हानी होणार नाही याची दखल घेतली पाहिजे असे सांगितले.प्रसंगी नागरीकांनी संपुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाप्रसंगी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावावे व त्याचे संगोपन करावे, अशी शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाअंतर्गत सुमारे 100 झाडे लावण्यात आली असून झाडांचे नियमित पालनपोषण करण्याची जबाबदारी संबंधित कॉलनी परिसरातील नागरीकांनी स्वीकारली आहे. यात वड, पिंपळ, कडुनिंब, चाफा, गुलमोहर, अशोकवृक्ष या वृक्षांचा समावेश होता. कार्यक्रमात “सासे हो रहि हे कम, आवो पेड लगाये हम” या ब्रिद वाक्याने कार्यक्रमाची सांगता झाली. चोपडा नगरपरिषदेच्यावतीने “एक व्यक्ती - एक झाड” या संकल्पनेत सहभागी व्हा व हरित, स्वच्छ आणि सुंदर चोपडा घडविण्यास हातभार लावा.असे आवाहन स्वच्छता निरिक्षक श्रीमती दिपाली साळुंके यांनी प्रास्ताविकातून केले.

  या कार्यक्रमात उपमुख्याधिकारी श्री.संजय मिसर, पा.पु.अभियंता श्री.जितेंद्र मोरे, विद्युत अभियंता श्री.प्रमोद पाटील, लेखापाल श्री.मयुर शर्मा, श्रीमती भारती पाटील, स्वच्छता निरिक्षक श्री. वसंत राठोड, श्रीमती दिपाली साळुंके, शहर समन्वयक स्वप्निल धनगर, , विजय करणकाळ, , भास्कर पाटील, दिगबर पाटील,कैलास राणे, पुंडलिक मराठे कैलाश मराठे. दीपक मराठे, शशिकांत चौधरी, किशोर ठाकरे, इ. श्रीराम नगर रहिवासी व महिलावर्ग चोपडा न.प.चे मुकादम व मदतनीस उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी निरिक्षक श्रीमती दिपाली साळुंके, श्री कमलेश पाटील, भरत देशमुख, योगेश शिरसाठ यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने