कोकण कट्टा व पंचरत्न मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम आदिवासी भगिनी समवेत भाऊबीज साजरी

 कोकण कट्टा व पंचरत्न मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम आदिवासी भगिनी समवेत भाऊबीज साजरी 

रायगड दि.२९(प्रतिनिधी) ग्राम संवर्धन च्या मार्गदर्शनाने पेण येथील निफाडवाडी, दोरेवाडी आणि कोरलवाडी या ठिकाणी हा कार्यक्रम  संपन्न झाला. या हृदयस्पर्शी कार्यक्रमाला सुमारे 300 भगिनींनी सहभाग घेतले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ मठ पारले महालक्ष्मी मंदिर साईधाम मित्र मंडळ गावदेवी मित्र मंडळ अश्या अनेक सेवाभावी  मंडळानी सहकार्य केले. यावेळी श्री निरंजन सोनक (आरसी एफ चे संचालक विपणन विभाग ) रायगड भूषण संतोष ठाकूर, कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे.व दादा गावडे तसंच पंचरत्नचे अशोक भोईर मान्यवर उपस्थित होते पारंपारीक पद्धतीने ओवाळणी करुन भगिनींना साडी चोळी भेट देण्यात आली.. स्थानिक ग्राम संवर्धन संस्थेचे मानसी, राजू व राजेश यांनी योग्य आयोजन केले.    

  कोकण कट्टा चे सुजीत कदम, प्रसाद वालावलकर, निशिकांत मोरे,  प्रशान्त कुर्ले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. पंचारत्नचे प्रदीप गावंड, सचिन साळुंखे, रमेश पाटील, शेख व घरत यांनी आयोजनात मोलाचे योगदान दिले. ग्रामस्थ तरुण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होता स्वागतासाठी त्यांनी आनंदानी जय्यत तयारी केली होती पुनः नक्की आमच्या वाडीला भेट द्यावी असे निमंत्रण हि दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने