पंकज प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थिनींचा जागतिक महिला दिनी राष्ट्रीय वेबिनार मध्ये सहभाग...
चोपडा दि.०९(प्रतिनिधी) :--- सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नँचरोपॅथी जळगाव यांचे मार्फत आयोजित ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय वेबिनार-मातृत्वद्वारा *खिलती कली का स्वागत* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
त्यात पंकज प्राथमिक विद्यालयातील इयत्ता सहावी व सातवीच्या ७६ विद्यार्थीनीनी सहभाग नोंदविला तसेच विद्यालयातील शिक्षिका श्रीमती गायत्री शिंदे,जयश्री पाटील,धनश्री जावळे, प्रियंका पाटील, सचिन लोखंडे, योगेश चौधरी व प्रफुल्ल महाजन यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.देवानंद सोनार (संचालक सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नँचरोपॅथी) यांनी केले.
डॉ.हर्षदा पाटील (व्याख्याता,पंचकर्म विशेषज्ञ) यांनी मुलींच्या मासिकधर्म काळात आई व मुलीची भूमिका कशी असावी तसेच या काळात कोणती काळजी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच प्रा.सोनल महाजन (योग - निसर्गोपचार विशेषज्ञ) यांनी चुंबकीय चिकित्सेद्वारा सौंदर्य समस्यांवर विशेष उपचार पद्धती या बाबतीत मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी *खिलती कली का स्वागत* या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी जळगांव या संस्थेचे व विद्यालयातील शिक्षिका यांचे विशेष आभार मानले आहेत.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.ज्योती वाघ, प्रा.गीतांजली भंगाळे, प्रा.अनंत महाजन, प्रा.पंकज खाजबागे यांनी परिश्रम घेतले..