अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे महिला दिनी आरोग्य सेविकांचा सन्मान....
चोपडा दि.०८ (प्रतिनिधी ):--- येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( ABVP ) तर्फे ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविकांचा , परिचारिकांचा त्यांच्या कार्याच्या गौरव व सन्मान वाढविण्याच्या दृष्टीने गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सदर सत्कार श्रीमती मनीषा धांडे श्रीमती आरती तायडे यांच्यासह इतर आरोग्यसेविका व परिचारिकांचा सन्मान करण्यात आला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( ABVP ) मार्फत राष्ट्रउभारणीच्या संदर्भातील विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. छात्रशक्ती हीच राष्ट्रशक्ती या घोषवाक्याच्या माध्यमातून ज्ञान , शील व एकतेचे रूप विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रतीत होत असते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चोपडा शाखेच्या माध्यमातून नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले जाते .त्याचाच एक भाग ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका ,आरोग्य सेविकांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रसंगी विशाल सोनवणे, हर्षल पाटील, भावेश पाटील, नम्रता महाले, समृद्धी पाटील, तेजू पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.....