मनवेल आश्रमशाळेत *महिला दिन साजरा*



*मनवेल आश्रमशाळेत *महिला दिन साजरा* 

 मनवेल , ता. यावल दि.०९(प्रतिनिधी गोकुळ कोळी)-  येथील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हुकूमचंद पाटील होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमांचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले . त्यानंतर शिक्षक राकेश महाजन यांनी स्वरचित कविता वाचून भूतकाळात होऊन गेलेल्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला . 

              जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील स्त्री अधिक्षिका सरीता तडवी , शिक्षिका भारती मरसाळे व विदयार्थीनी यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला . त्यानंतर अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांची जीवनकहाणी ध्वनीफितद्वारे विदयार्थ्यांना ऐकविण्यात आली .           

          कार्यक्रमाला प्राथमिक मुख्याध्यापक संजय अलोणे , माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील , अधीक्षक वसंत पाटील सह शिक्षक  व विदयार्थी उपस्थित होते . फलक लेखन राजेश भारुळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश महाजन यांनी केले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने