आठ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर अडकला..तो खूखांर बिबट्या*

 

*आठ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर अडकला..तो खूखांर बिबट्या*


नाशिक दि.०१ : सकाळपासून नाशिकरोड
परिसरात आढळून आलेल्या बिबट्याचा शोध सुरु होता. अखेर
बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. 8
तासांच्या प्रयत्नांनतर हा बिबट्या वनविभागाच्या पिंज-यात कैद
झाला आहे. वनविभागाच्या गाडीत हा बिबट्या रवाना करण्यात
आला आहे.येथील जय भवानीरोड परिसरात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास शिवसेनेचे कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड यांच्या घराच्या पाठीमागच्या जागेवर बिबट्या दिसला असल्याची माहिती मिळाली होती. बंगल्याच्या पार्किंगमध्ये बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. सकाळपासून या बिबट्याचा शोध सुरु होता. तब्बल आठ तास शोधाशोध केल्यानंतर अखेर हा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने