आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून धनवाडी गावात 20 लाखाचे सामाजिक सभागृह 5 लाखाचे पेवर ब्लॉक कामांचे भूमिपूजन


आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून धनवाडी गावात 20 लाखाचे सामाजिक सभागृह  5 लाखाचे पेवर ब्लॉक कामांचे भूमिपूजन

चोपडा दि.०१(प्रतिनिधी कैलास बाविस्कर)   मा. सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे,आमदार चोपडा विधानसभा मतदार संघ यांच्या आमदार निधीतून आज धनवाडी गावात 20 लाखाचे सामाजिक सभागृह ( मंगल कार्यालय) व 5 लाखाचे पेवर ब्लॉक बसवण्याचे कामाचे उद्घाटन मा. माजि.आमदार अण्णासो. चंद्रकांत जी सोनवणे (रावेर लोकसभा सहसंपर्क प्रमुख) यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय आमदार लताताई सोनवणे व माननीय दादासो श्यामकांतजी बळीराम सोनवणे (उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जळगाव) यांच्या  हस्ते संपन्न झाले.  

त्याप्रसंगी चोपडा तालुका शिवसेना  प्रमुख मा.राजेंद्र पाटील, झेड.पी.सदस्य मा.हरीश भाऊ पाटील ॲड.शिवराज पाटील,संपूले,विकास भाऊ पाटील मा. उपनगराध्यक्ष चोपडा,अशोक पा.नितीन चौधरी,मंगल भाऊ कोळंबा सरपंच, छोटू भाऊ,रामदास दादा वडगावसिम मुकेश कोळी,गुलाब कोळी कठोरा,सागर भाऊ ओतारी,सागर कोळी राम पा. संपुले.तसेच सोबत आलेले शिवसैनिक.गावातील सर्व ग्रामस्थ व महिला वर्ग तसेच सर्व तरुण शिवसैनिक शेकडोंच्या संख्येने  मोठ्या उत्साहाने हजर होते.

         धनवाडी गावा च्या इतिहासात प्रथमतःच आज आमदार निधीतून एवढे मोठे काम व एवढा मोठा निधी माननीय अण्णासाहेब चंद्रकांत जी सोनवणे यांनी उपलब्ध करून दिला व आमच्या गावाच्या विकासाला चालना दिली.त्यामुळे अण्णा साहेबांचे आम्ही सर्व धनवाडी ग्रामस्थ सदैव ऋणात राहू व अण्णासाहेबांचे व ताईसाहेब यांचे आभारी आहोत.

       

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने