*चोपडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेशाचा चढता आलेख आनंददायी-अँड.संदीप पाटील*
चोपडा दि.०२ (प्रतिनिधी) अभ्यासाचे काटेकोर नियोजन व परिश्रम घेण्याची तयारी ठेवली तर, अपेक्षित यश संपादीत करता येते याची प्रचिती आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रसाठी दर वर्षी होणाऱ्या प्रवेशावरून सिद्ध झाले असल्याची भावना भैय्यासाहेब अँड.संदीप सुरेश पाटील यांनी व्यक्त केली.
महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा संचलित कला,शास्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांचा एम.बी.बी.एस. तर प्रत्येकी एक विद्यार्थी बी.डी.एस. व फिजिओथेरपी या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेशित झाल्याने त्यांचा संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब अँड.संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते आज दि.२-०२-२०२२ रोजी महाविद्यालयात सत्कार करण्यात आला त्या कार्यक्रमात अँड.पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या यशात पालक व शिक्षक तसेच महाविद्यालयातील सर्वच घटक सहभागी आहेत. या सर्वांचे त्यांनी अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा दिल्यात.
या वेळी कु.कोमल यशवंत पाटील,
कु.सृष्टी सुशिल सूर्यवंशी,चि.हिमांशू भगवान हळपे,सचिन जगदिशप्रसाद भारती या विद्यार्थ्यांचा एम.बी.बी.एस.
या अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे जी.एम.सी.नंदुरबार,सुमनदीप कॉलेज बडोदा, प्रवरानगर कॉलेज लोणी,
आजमगड गव्हर्नमेंट कॉलेज उ.प्र.
येथे तर, कु.अनुष्का रविंद्र पाटील हिचा बी.डी.एस.अभ्यासक्रम साठी ए.सी.पी.एम.कॉलेज धुळे येथे आणि चि.विश्वतेज अतुल पाटील यांचा फिजिओथेरपी अभ्यासक्रम साठी भारती विद्यापीठ सांगली येथे प्रवेश निश्चित झाल्याने या सर्व विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब अँड.संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळीप्राचार्यडॉ.डी.ए.सूर्यवंशी,उपप्राचार्यप्रा.डॉ.ए.एल.चौधरी,उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही.टी. पाटील,उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के. एन.सोनवणे,उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे,पर्यवेक्षक प्रा.एस.पी.पाटील विद्यार्थ्यांचे पालक,प्राध्याक तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी मानलेत