७ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर

 




सातव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर


मुंबई,दि.१८(शांताराम गुडेकर) राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईच्या वतीने आयोजित सातवे ग्रामीण साहित्य संमेलन हे लांजा तालुक्याच्या  पूर्व भागातील प्रभानवल्ली खोरनिनको या गावी ४ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थान हे साखरपा गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ साहित्यिक  अशोक लोटणकर हे भूषवणार आहेत.

           ज्येष्ठ कवी अशोक लोटणकर यांची ललित गद्य, कथा, कविता, समीक्षा, बाल वाङमय इ. साहित्य प्रकारातील एकूण १८ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या साहित्य कृतींना  नामांकित  संस्थांचे २५ हून अधिक मानाचे वाङमय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. लोटणकर हे कोकणातील असल्याने अध्यक्ष स्थानी त्याची निवड झाल्यामुळे त्यांचे साहित्यिक मित्रांकडून अभिनंदन केले जात आहे. लोटणकर हे बी.ई.एस.टी. मुंबई मधून ' डेपो मॕनेजर ' या पदावरून सेवा निवृत्त झालेले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने