राजगाटा चक येथे वाघाच्या हल्ल्यात महिलेचा बळी..वनविभागाने वाघांचा धुमाकूळ थांबवावा.
गडचिरोली (प्रतिनिधी चक्रधर मेश्राम) दि. 18. :राजगाटा चक येथील महिला नामे अनुसया शामराव मोगरकर वय 55 वर्ष ही महिला जंगलात सरपन करायला गेली असता 1.30 ते 2.00 वाजताच्या सुमारास दडी मारून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून जागीच जिवंत ठार केले.
वनविभागाच्या नेहमीच्या भोंगळ, गलथान कारभारामुळे ही महिला आज ठार झाली आहे ,जंगलात या पूर्वी सुद्धा अनेक जणांचे बळी गेले आहेत याला जबाबदार आहे तरी कोण?? असा प्रश्न लोकांना पडला आहे, लोकांना आश्वासन देऊन मग का बर मोफत सिलेंडर गॅस ची सुविधा वनविभाग कर्मचाऱ्यांनी लोकांना पर्यंत पोहचविले नाहीत. खोट्या आश्वासनांमुळे आज ह्या महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे.
या प्रकरणाकडे वनविभाग काय कार्यवाही करतात याकडे परिसरातील सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.