*शारदा विद्या मंदिर महाविद्यालय साकळी येथे शाळाप्रवेशोत्सव साजरा*
मनवेल ता.यावल दि.०४ (वार्ताहर )
चारा नोव्हेंबर सोमवार पासून पाचवी ते सातवीचे वर्ग सुरु झाल्याने शारदा विद्या मंदिर महाविद्यालय साकळी येथे शाळाप्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब श्री वसंतराव रामजी महाजन, कार्याध्यक्ष, नानासाहेब श्री सुभाष भास्करराव महाजन, ज्येष्ठ संचालक श्री मुक्तार सरदार तडवी,श्री सुरेश पुनमचंद लोधी, केंद्रप्रमुख श्री किशोर चौधरी, प्राचार्य श्री जी पी बोरसे, पर्यवेक्षक श्री एस जे पवार, श्री डी एल चांदणे, श्री किरणकुमार चौधरी,श्री बी इ महाजन हे होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवोप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प ,पुस्तके देऊन करण्यात आले, यानंतर विद्यालयाचे प्राचार्य श्री. जी पी बोरसे, यांनी कोविड 19 प्रादुर्भाव,बचाव, सोशल डिस्टन्स, मास्क , शाळा सुरू करण्यायाविषयी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. यानंतर केंद्रप्रमुख श्री किशोर चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यानंतर अध्यक्ष दादासाहेब श्री वसंतराव रामजी महाजन, यांनी ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाइन शाळेची गुणवत्ता, शिक्षणाचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम ए महाजन यांनी केले तर आभार श्री सदाशिव पी निळे यांनी केले
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य,पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.