पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टीने* *विद्यार्थ्यांचे स्वागत.....*





 *पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टीने* *विद्यार्थ्यांचे स्वागत.....*

पाळधी ,दि. 4  ( प्रतिनिधी) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शिक्षण प्रसारक संस्था साळवा संचलित पाळधी  बुद्रुक येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात फ्रेशस विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रतापदादा पाटील हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून  माध्यमिक शाळेचे  मुख्याध्यापक मा. डी.डी कंखरे, प्राचार्य योगेश करंदीकर व प्रिन्सिपल सचिन पाटील हे  होते.कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावर्षी ज्युनियर महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा  शासनाच्या परवानगीने ऑफलाइन पद्धतीने शाळेचा पहिला दिवस होता.त्यानिम्मिताने विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टीचे  करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व बौद्धिक विकास व्हावा या उद्देशाने गीत गायन, नृत्य,फनी गेम्स, शेलापागोटे तसेच विविध बौद्धिक खेळ घेण्यात आले. यात  विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आनंद लुटला. शेवटी या कार्यक्रमातून मिस फ्रेशर्स म्हणून कु. निकिता अनिल पाटील (11वी विज्ञान )तर (मिस्टर फ्रेशर्स धीरज नाना पाटील (11वी विज्ञान) यांची गुणांच्या आधारे निवड करण्यात आली. विजेत्यांना मा. प्रताप दादा पाटील यांच्या शुभहस्ते बक्षिसे देण्यात आली.त्यानंतर मा. प्रताप दादा यांनी  यशस्वी जीवनाची सुत्रे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मनोगताचा समारोप केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जयश्री पवार यांनी केले.तर या कार्यक्रमात विविध खेळांचे आयोजन प्रा. भूषण पाटील, प्रा. मोनिका पाटील, प्रा. दिपाली पाटील प्रा. शुभांगी सोनवणे,प्रा.संजय बाविस्कर प्रा.राकेश धनगर यांनी विविध स्पर्धेचे आयोजन करून या कार्यक्रमाची रंगत वाढवली यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी कोरोनाचे नियम पाळून  उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने