संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यांचा यावल येथे सत्कार
मनवेल ता.यावल दि.०४ ( वार्ताहर )
जळगाव जिल्हाधिकारी यांनी नुकतीच घोषीत केलेल्या यावल तालुका संजयगांधी निराधार योजना समितीच्या नवनिर्वाचित सन्मानीय अध्यक्ष व सदस्य यांचा सत्कार रावेर-यावल विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी खलील सन्मानीय अध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला, मा.श्री शेखर पाटील अध्यक्ष, सदस्य श्री ज्ञानेश्वर बऱ्हाटे, श्री दिनकर पाटील, शे जावेद जनाब, अहमद अली, श्री संदीप भैया सोनवणे, अपंग प्रतिनिधी श्री नितिनमहाजन सुभाष साळुंखे, श्री तुषार सांडूसिंग पाटील, श्री राजू अरमान तडवी, महिला सदस्य सौ योगिता देवकांत पाटील.
याप्रसंगी सोबत जि प सदस्य प्रभाकरअप्पा सोनवणे यावल, विधान सभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे, खरेदी विक्री संघ संचालक अमोल भिरुड,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष ऍड देवकांत पाटील , राजेश करांडे, शहराध्यक्ष कदिर खान उपस्थित होते.