जामनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा.. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
जामनेर दि.०४ (प्रतिनिधी करण साळूंके): तालुक्यात सप्टेंबर महिन्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली.या आसमानी संकटामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील कापुस,मका,ज्वारी,सोयाबीन तसेच केळी इ.पिकांचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनी व गुरे ढोरे वाहून गेली.अजूनही सतत पाऊस सुरू असल्याने राहिलेली पिके नष्ट झालेली आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या या आसमानी संकटामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी पूर्णपणे नेस्तनाबूत झाले आहे.अशा परिस्थितीत तालुक्यातील शेती नुकसानीचे सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी. महाविकास आघाडी सरकार नेहमीच खंबीरपणे उभे राहते,यावेळीही शेतकऱ्यांना मदत करून दिलासा द्यावा अशाप्रकारचे निवेदन तहसील कार्यालय जामनेर येथे मुख्यमंत्र्यांना तहसिलदार अरूण शेवाळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने देण्यात आले.
यावेळी संजय दादा गरुड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते,वंदनाताई चौधरी महिला जिल्हाध्यक्षा, विलासभाऊ राजपूत उपजिल्हाध्याक्ष, किशोर पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख, जामनेर, संदीप हिवाळे जामनेर तालुकाध्यक्ष,सामाजिक न्याय विभाग, राजेश नाईक जामनेर तालुकाध्यक्ष ओ.बी.सी.सेल, माधव चव्हाण जिल्हा सरचिटणीस, डॉ.प्रशांत पाटील तालुकाध्यक्ष रा.यु. काँ.प. जितेश पाटील जामनेर शहराध्यक्ष, रा. काँ.प. विनोद माळी जामनेर शहराध्यक्ष, रा. यु. काँ.प. इम्रान शेख, गजानन पंडित, सागर कुमावत, निलेश खोडपे, अविनाश वाघ, किशोर खोडपे, विवेक कुमावत, नाना पाटील, विशाल पाटील, आरिफ शेख, गोकुळ पाटील, नरेंद्र जंजाळ, ज्ञानेश्र्वर पाटील, ज्ञानेश्वर शेळके, उमेश पाटील, दिपक पाटील, राहुल इंगळे, किशोर तायडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.