दोन वर्षानंतर शाळा सुरू विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह*



 *दोन वर्षानंतर शाळा सुरू विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह* 



पोलखोल न्यूज/सुनिल सोनवणे,चांदवड 

चांदवड दि.०४ शहरातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आज खूपच आनंद ओसंडून वाहत होता शासनाच्या नियमाप्रमाणे आज पासून आठवी ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीऐवजी आता प्रत्यक्ष शिक्षण शिक्षक व वर्गात बसून घेता येणार असल्याने विद्यार्थी अत्यंत आनंदी दिसत होते


 शहरातील उषाराजे होळकर विद्यालय, जे आर जी विद्यालय, उर्दू हायस्कूल, व श्री नेमिनाथ जैन हायस्कूल या शाळेतील विद्यार्थी अत्यंत आनंदी मनाने शाळेकडे येताना आज दिसत होते सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रचंड उत्साहात मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल देऊन सत्कार केला. सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे टेंपरेचर घेऊनच व सॅनिटायझर चा वापर करून विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यात येत होते यावेळी विद्यार्थ्यांना बघून शाळेत शिक्षकांचाही आनंद चेहऱ्यावर दिसत होता


 *महाराणी उषाराजे होळकर विद्यालय*

 चांदवड या ठिकाणी शाळेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात बघाया बघावयास मिळाला विद्यार्थ्यांचे स्वागत प्राचार्य बारगळ सर किती जाधव एस के पवार टी आर देशमुख गांगुर्डे एस के निकम एचडी शिंदे एम एस ठाकरे एमजी पवार यु एफ गुंजाळ जेडी जाधव व काळे सर यांनी केले


 *उर्दू हायस्कूल चांदवड*

     आज शाळेचा पहिला दिवस असल्याकारणाने शाळेत विद्यार्थ्यांचे' येण्याची लगबग सुरू होती यावेळी शाळेच्या प्राचार्य  प्राचार्य परवेजा शेख (मॅडम) व संस्थेचे चेअरमन रिजवान घाशी, शाळेतील शिक्षक एम.आर.खान, शेख मोहम्मद आय. के., आर. आर. मिर्झा, फरहात शेख (मॅडम) व हायस्कूलचा सर्व स्टॉप यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.


 *जे. आर.जी.विद्यालय चांदवड*

उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत करण्यात आले व पुस्तके न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक उपक्रमांतर्गत पुस्तकांचे वाटपही करण्यात आले.

 याप्रसंगी प्राचार्य एस एन लोहकरे, मविप्र संस्थेच्या संचालिका सौ नंदाताई सोनवणे, एस. पी. पाटील, जिभाऊ शिंदे, डी. वाय. काळे, आर.सी.महाले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने