कामिनी पाटील ची आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड..
चोपडा ,दि.०४( प्रतिनिधी ):----
आग्रा येथे नुकत्याच २८ वी जूनियर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्यात आले होते .या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने तृतिय क्रमांक मिळवला .या महाराष्ट्राच्या संघात अष्टविनायक स्पोर्ट्स क्लब चोपडा येथील सात मुलींचा समावेश होता. या मुलींमध्ये *कामिनी पाटील व पूजा पाटील या पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा* येथील विद्यार्थीनी आहेत. त्यांनी स्पर्धेत चांगली कामगिरी बजावल्यामुळे महाविद्यालयाची खेळाडू कामिनी पाटील (एस.वाय.बी ए) हीची भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड करण्यात आली असून ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५ ऑक्टोबरला नेपाळ येथे रवाना होत आहे. कामिनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत निवड झाल्याबद्दल तिचे व तिच्या आई,वडीलांचे पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले,संचालक भैय्यासाहेब पंकज बोरोले,सर्व संचालक मंडळ, एम.व्ही.पाटील , व्ही.आर.पाटील, मिलिंद पाटील , नीता पाटील , रेखा पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.माधव वाघमोडे.क्रीडा संचालक प्रा.डॉ. विजय पाटील,प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पंकज समूहातील सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.