हि .मो. करोडपती माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात..!



 



हि .मो. करोडपती माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात..!                        

चोपडा ,दि.०४(प्रतिनिधी)

दिनांक-४ आॕक्टोबर २०२१ वार-सोमवार रोजी कै.हि.मो.करोडपती माध्यमिक विद्यालय,चोपडा जि.जळगाव*  चा *इयत्ता-८ वी ते इयत्ता-१० वी   चा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम* श्री.जीवनलाल वाडीले सर (विषय साधन व्यक्ती- गटसाधन केंद्र- पंचायत समिती,चोपडा जि.जळगाव)   विद्यार्थी-विद्यार्थिनीं व सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधु- भगिनींच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

              यावेळी शाळेत उपस्थित असलेल्या शिक्षक-शिक्षकेतर तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हँड सॕनिटाईज व आॕक्सिमीटर व पल्समीटर ने ताप व आॕक्सिजन लेव्हल तपासणी करुन,विद्यार्थी-विद्यार्थिनींची बैठक व्यवस्था  सोशल-डिस्टन्सिंग च्या नियमांनुसार करण्यात आली.तसेच क्रमिक पाठ्यपुस्तके वितरीत करुन मास्क चे वाटप करण्यात आले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यु-ट्युबवर *माझा विद्यार्थी- माझी जबाबदारी* हा कार्यक्रम आपल्या मोबाईल वर पाहिला. शाळा प्रवेशोत्सवा वेळी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनीं मध्ये आनंदाचे वातावरण होते.

           यावेळी प्र.मुख्याध्यापक श्री.एन.बी.बडगुजर सर,श्री.मंगेश भोईटे सर,श्री.ए.पी.बडगुजर सर,श्रीमती सी.पी.बडगुजर मॕडम,श्रीमती.व्ही.बी.साळुंखे मॕडम,श्रीमती पी.सी.बडगुजर मॕडम,श्रीमती एस. टी.बोरसे  मॕडम तसेच श्री.अशोक बडगुजर,श्री.विलास सनेर आदींनी शाळा प्रवेशोत्सव सोहळा यशस्वी केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने