श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम.

 



श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची उज्ज्वल  निकालाची परंपरा कायम..

चोपडादि.०४(प्रतिनिधी) येतील बी फार्मसी महाविद्यालयाचा विद्यापीठाच्या परीक्षेचा १०० टक्के निकाल लागला असून प्रथम वर्ष बी .फार्मसीत कु .पुर्वा देशमुख (CGPA score ९.८९) प्रथम क्रमांक ,चि.सुजित नीनायदे (CGPA score ९.८५) द्वितीय क्रमांक, कु.शहजादी हलवाई (CGPA score ९.८१) तृतीय क्रमांक, द्वितीय वर्ष बी. फार्मसीत कु. सलोनी अग्रवाल (CGPA score १०.००,६९३/७००) प्रथम क्रमांक ,कु .वैष्णवी पाटील( CGPA score १०.००,६८८/७००) द्वितीय क्रमांक,कु .योगिता याद्निक (CGPA score १०.००,६८७/७००) तृतीय क्रमांक, तृतीय वर्ष बी.फार्मसीत कु.पायल अहेर (CGPA score १०.००,७२७/७५०) प्रथम क्रमांक, कु.भाविका जोशी (CGPA score १०.००,७२५/७५०) द्वितीय क्रमांक,कु.कोमल पालवे (CGPA score १०.००,७२४/७५०) तृतीय क्रमांक व चतुर्थ वर्ष बी. फार्मसीत कु.अश्विनी पाटील (CGPA score ८.७७) प्रथम क्रमांक, कु.याद्निकी नेहते (CGPA score ८.६८) द्वितीय क्रमांक, कु.अश्विनी पाटील (CGPA score ८.६१) तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले.  महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा काल संपन्न झाला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष आदरणीय  भैय्यासाहेब.अ‍ॅड.संदीपभैय्या सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांनच्या यशाचे कौतुक करून येणाऱ्या काळात औषधनिर्मितीच्या क्षेत्रात भारत अग्रेसर होणार असून या क्षेत्राला उज्ज्वल भवितव्य असून या संधीचे सोनं करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ वडनेरे यांनी महाविद्यालय हे विध्यार्थ्यांना च्या सर्वांगीण प्रगतीसाठी केंद्रित असून त्याच अनुषंगाने या वर्षी एनबीए च्या पुनर्मुल्याकनाच्या तिसऱ्या फेरी साठी प्रयत्नशील असून त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांनच्या प्रगतीला होत असतो असे सांगितले .महाविद्यालयात कार्यरत प्रा डॉ भरत जैन यांची फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या वतीने राबविले जाणारे क्षमता निर्माण औद्योगिक प्रशिक्षण (CBIT) अंतर्गत निवड झाली व अनुदान प्राप्त झाले यामुळे त्यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला सचिव माननीय ताईसाहेब डॉ.स्मिताताई संदीप पाटील,कार्यकारी संचालक भाऊसो डी बी देशमुख,प्राचार्य.डॉ. गौतम प्रकाश वडनेरे व सर्व प्राध्यापक, प्रबंधक, उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने