नगर परिषदेचे सत्ताधारी पक्षाचे गटनेते झुंजार कार्यसम्राट मा.श्री.रावसाहेब अनिल वानखेडे यांनी घेतली दखल..गर्ल्स हायस्कूल परिसरातील भरपावसात झाली साफसफाई..*
शिंदखेडा दि.०४ (प्रतिनिधी रवि शिरसाठ ) येथील नगर परिषदेचे सत्ताधारी पक्षाचे गटनेते झुंजार कार्यसम्राट मा.श्री.रावसाहेब अनिल वानखेडे यांचेकडे गर्ल्स हायस्कूल मुख्यध्यापक प्रा.दिपक माळी सर यांनी शाळा परिसरात झालेल्या घाणीचे साम्राज्य बाबतीत निर्माण झालेली समस्या मांडली असता रावसाहेबांनी ताबडतोब लक्ष घालून साफ करण्यात आल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.*
गर्ल्स हायस्कूल च्या मागे खूपच काटेरी झुडपे आणि कचरा होता. नगरपंचायत प्रशासनाला तो साफ करून देण्याची विनंती केली होती.
नगरपंचायत सत्ताधारी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांनी तात्काळ दखल घेऊन गांधी जयंतीच्या सकाळी भर पावसात ही सफाई करून दिली. जे सी बी चालकांनीदेखील काहीच कुरकुर न करता विद्यार्थ्यांनी आणि शाळेच्या हितासाठी सहकार्य केले. त्याबद्दल गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांचे व न.पा.कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.