*'वीर गुर्जर'उच्चारताच अंगात संचारते वीरश्री*-मा.जि.प. अध्यक्ष श्री गोरख तात्या पाटील
चोपडा दि.०८(प्रतिनिधी)*आज दि 9 सप्टेंबर 2021रोजी गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज यांची जयंती कन्या विद्यालय, चोपडा येथे साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने राजा मिहीर भोज यांच्या प्रतिमेचे पुजन गोपालभाऊ चौधरी, वढोदा यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख मान्यवर गोरख तात्या यांनी मनोगत व्यक्त करताना वीर गुर्जर उच्चारल्यावर आजही अंगात वीरश्री संचारते,असे प्रतिपादन केले, तर मुख्या. विलास पाटील सर यांनी गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी समाजबांधवांनी मिहिर भोज यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.कार्यक्रमाला एम.व्ही. पाटील सर मा. उपसभापती,राजुभाऊ देशमुख मा. उपनगराध्यक्ष, एस.एच.पाटील सर, विलास पी.पाटील सर, नंदुकिशोर पाटील मा.सभापती कृउबा, एल.एस.पाटील, डी.बी. पाटील, आबा देशमुख, राजाराम पाटील नगरसेवक, महेश देशमुख ,दुर्गादास पौलाद पाटीलआदि मान्यवर उपस्थित होते तसेच यावेळी नितीन चौधरी, मंगल बा, बी एल देशमुख, एस आर पाटील, दिपक बापु, कैलास भाऊसाहेब ,पी एस पाटील सर, तुषार पाटील,ए.एम. पाटील,गोपाल पाटील सर, अशोक पाटील,प्रशांत पाटील सर, गोपाल पाटील सर , मनोहर पाटील, विनायक चौधरी, जयंत पाटील , महेश पाटील, सचिन पाटील, नंदकिशोर देशमुख,गुमान गुजर,तसेच इतर समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पाटील सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत पाटील सर यांनी केले.* कार्यक्रमाचे आयोजन मिहीर भोज जयंती आयोजक समिती,चोपडा यांनी केले.*