तहसीलकार्यालय समोर रात्री ठिय्या आंदोलन ..अतिक्रमनाचा तिढा सुटणार, प्रशासनाने दिले ठोस आश्वासन*शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांच्यानेतृत्वाला यश*
यवतमाळ;दि.०३ (जिल्हा प्रतिनिधी शेख राजिक ):
तालुक्यातील शेळी येथील सार्वजनिक पोळा जागेवरील अतिक्रमण जागेचा प्रश्न रात्री चांगलाच चिघळला. तहसीलदार राळेगाव यांनी अतिक्रमण काढण्याकरीता आदेश निर्गमित करून मंडळ अधिकारी यांना मात्र तोंडी आदेश देऊन केवळ पंचनामा करण्यासाठी पाठवल्याने गावकरी संतप्त झाले. रात्री तहसीलकार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष बाळू धुमाळ व शेळी येथील 40 ते 50 नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. कुणाच्या दबावात न्याय मागणी दडपन्याचा प्रयत्न करीत आहे. असा सवाल गावकरी करीत होते. रात्री 10 वाजे पर्यंत शेळी येथील शेतकरी, महिला भगिनीं ग्रा. प. सदस्यांनी ठिय्या दिला. तहसीलदार, बीडीओ, पोलीस निरीक्षक राळेगाव यांनी अतिक्रमण काढण्याची कारवाई लगेच केल्या जाईल या ठोस आश्वसना नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या वेळी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तहसीलदार राळेगाव यांनी बीडीओ, मंडळ अधिकारी यांना रात्री बोलावून घेतले. शेळी येथून अधिक नागरिक यायला लागल्यावर पोलिसांना पाचारण करण्यात आले. जो पर्यंत अतिक्रमण हटत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरु राहिल अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यावर प्रशासनाची कोंडी झाली.
शेळी येथील सार्वजनिक पोळा भरतो त्या जागेवर गावातीलच एका वेक्तीने अतिक्रमण केले. पुढे पोळा सण असल्याने गावात विनाकारण वाद होऊ शकतो या आशयांच्या तक्रारी ग्रा. प. कडे करण्यात आल्या. यावर 9 ऑगस्ट 2021 रोजी मासिक सभा ठराव क. 2 अन्वय अतिक्रमण काढण्यात यावे हा बहुमताने ठराव घेण्यात आला. समंधितना नोटीस बजावून देखील हे अतिक्रमण काढण्यात आले नाही. त्या तिसरी नोटीस 24 ऑगस्ट रोजी अतिक्रमण हटवण्याची कार्रवाही करण्यात येइल त्यामुळे पोलीस प्रोटेक्शन ची लेखी मागणी ग्रा. प. द्वारे तहसीलदार यांच्या कडे करण्यात आली. यावर तहसीदार राळेगाव यांनी 27 ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक राळेगाव यांना शेळी येथील अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याचे पत्र दिले. मात्र पंचनामा करण्यासाठी मंडळ अधिकारी यांना पाठविले. त्या मुळे गावकरी संतप्त झाले. अतिक्रमण काढण्याची बोळवन पंचनाम्यात का करण्यात आली. नियमानुसार कार्रवाही करण्यामध्ये कोणता दबाव आहे. असा सवाल करण्यासाठी तहसीलदार यांच्या केबिन ला गेलें. मात्र त्यांची बोळवण करण्यात आल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. जो पर्यंत सेळी येथील अतिक्रमण हटवन्यात येतं नाही तो पर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका घेऊन गावकरी रात्री उशिरा पर्यंत ठिय्या देत होते.ठोस आश्वसना नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
----------------------------------------
*शेळी येथील अतिक्रमण बाबत ग्रा. प. ने ठराव घेतला आहे. समंधितांना नोटीस बजावन्यात आल्या. काल रात्री शशिकांत उर्फ बाळू धुमाळ, ग्रा. प. सदस्य व आंदोलकांशी चर्चा करण्यात आली. प्रशासन शेळी येथील अतिक्रमण|बाबत नियमानुसार कारवाई करेल रविकांत पवार गट विकास अधिकारी राळेगाव यांनी सांगितले
----------------------------------------
" *पोळा सण तोंडावर गावाची शांतता धोक्यात येऊ शकते. ग्रा. प.पदाधिकारी महिला, व शेतकरी बांधव यांच्या भावना लक्षात घेऊन न्याय मागणी लावून धरली. प्रशासनाने* *कार्रवाही करण्याचे आस्वासन दिले आहे. शेळी येथील हे अतिक्रमण त्वरित उठवन्यात यावे अशी न्याय मागणी आमची आहे*.
-शशिकांत उर्फ बाळू धुमाळ
अध्यक्ष राष्ट्वादी काँग्रेस राळेगाव