तमाशा कलावंत भोकरकर कै.नथ्थुभाऊ सोनवणे यांचे चिरंजीव दत्तू भाऊ सोनवणे यांचा तमाशा फड आख्खा महाराष्ट्रभर रसिकांना भुरळ घालणारा..*

 



*तमाशा कलावंत भोकरकर कै.नथ्थुभाऊ सोनवणे यांचे चिरंजीव दत्तू भाऊ सोनवणे यांचा तमाशा फड आख्खा महाराष्ट्रभर रसिकांना भुरळ घालणारा..*


प्रिय रत्नपारखी रसिक राज. 

"नाते कलेचे त्या रक्ताशी "

  या लेख मालेचे आकर्षण कै.नथु भाऊ सोनवणे. 

यांचे चिरंजीव दत्तू भाऊ (आबा) सोनवणे भोकरकर ता.जि. जळगाव होय. हा तमाशा अतिशय जुना असून पारतंत्र्या पूर्वी चा होय. नथू भाऊ हे लहान पणी शेतीचे व गाई चारण्या चे काम करीत होते.वयात आल्या नंतर त्यांनी मनात गाठ बांधली की आपणही तमाशा उभा करू.अंगात थोडी फार कला असल्यामुळे ते जिद्दी ला लागले. नथू  भाऊचा चा जन्म 1924 साली झाला होता. त्यांनी २८वर्षाचे असताना तमाशा फड चालू केला. खानदेश मध्ये त्यांचा तमाशा 1 नंबर ने चालत होता. पूर्वी तमाशा फडात स्त्रीया नसून पुरुष च नाचण्याचे काम करीत होते. गण गवळण,मराठी लावण्या आणि वग नाट्य अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवून खानदेश मध्ये व महाराष्ट्रामध्ये नाव झाले. नथु भाऊने  राजा हरिश्चंद्र या वग नाट्या मध्ये राजाची भूमिका करून त्यांना खान्देशातील रसिकांनी डोक्यावर घेतले. त्यांचे नाव प्रतेक रसिकांच्या ओठांवर कोरले गेले. शेवटी 55 वर्ष रसिकांची सेवा करून पारलौकि निघून गेले. कै. नथु भाऊ वारल्या नंतर तमाशाची सर्व सूत्रे दत्तू भाऊ सोनवणे यांनी हाती घेतली. त्या वेळी दत्तू भाऊ चे वय 32 वर्षा चे होते दत्तू भाऊंना  कलेचा गंध नसताना ही खानदेश मध्ये पार्टी 1 नंबर ने चालवण्याची मनात गाठ बांधली वडिलांच्या पायावर पाय ठेऊन त्याच पद्धतीने गण गवळण ,रंग बाजी, वग नाट्य चालू ठेवली. त्यांनी राजा हरिश्चंद्र,विक्रमाची साडीसाती ,जादूगार भुरा हलवाई, आसराज बसराज,

मनमोहिनी ,जंगल बहिरी, माधव मालती, आणि भक्त पुंडलिक ही वग नाट्य करून खानदेश मध्ये छाप टाकली. पण काळाच्या ओघाने फॅशन च्या आहरी जाऊन स्त्रियांना नाचण्याचा प्रसंग आला. सध्याच्या कली युगाला धरून, व आपल्या वडिलांचे नाव अजरामर राहण्यासाठी दत्तू भाऊ सोनवणे, ही आपली जिद्द पूर्ण करीत आहेत. वडिल वारल्या नंतर आज पर्यंत 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. 

दत्तू भाऊ ची राहणी साधी भोळी कलाकारांवरील प्रेम,सुख दुःखाचे वाटेकरी, कलेची आस्था,व्यसन मुक्ती, या सर्वाचे अनुकरण करून कलेसाठी फार मोठे योगदान आहे. त्यांचे वडिल नथू भाऊ 78 वर्षाचे होऊन वारले.आज दत्तू भाऊ चे वय 57 वर्षाचे आहे. या तमाशा मंडळाला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत.खान्देशातील रसिक वगनाट्याचे चाहते असुन, नथुभाऊंच्या तमाशाला बारकु जोशी जळगावकर, स्त्री पात्र करणारे, पंडीतराव ठाकरे कडवाडीकर, आणि सोंगाड्याचे काम करणारे, भोजुभाऊ वाघडुजकर, या तीन कलाकारांनी संपुर्ण ५० वर्षाचे आयुष्य नथुभाऊंच्या तमाशाला, अर्पण केले. या खान्देशमधील तीन कलाकारांचे या तमाशासाठी लाख लाख मोलाचे योगदान आहे, यात शंकाच नाही...... खान्देशात सकाळच्या ६/७वाजेपर्यंत तमाशा रसिक आपली जागा सोडीत नाही. 

  खरच....

 दत्तू भाऊ (आबा) सोनवणे. यांना रंग भूमि वरील कोणताही कलेचा नाद नसला तरी आबांना कलेची आवड भरपूर असून कलेची जाणीव देखील भरपुर आहे . इतक्या वर्ष तमाशा चालवणे म्हणजे ही

 नवलाची गोष्ट म्हणावी लागेल....

कला ही, परमेश्वरानी दिलेली अनमोल देनगी आहे .रसिकांनी आदर केला पाहिजे  कला ही जिवंत आहे, ती टिकली पाहिजे. ती अजरामर राहावी असे आबा नेहमी सांगतात. 

  आबा तुम्ही केलेल्या रंग देवतेच्या सेवेला,तुमच्या वडिलांच्या अजरामर नावाला आणि तुम्ही दिलेल्या कलेसाठी योगदानाला त्रिवार मनाचा मुजरा.....

 मा.आबा तुमच्या हातून रसिकांची, रंग देवतेची सेवा घडो, तुमचे नाव खानदेश मध्ये व महाराष्ट्रामध्ये गरजत राहो. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. तुमच्या वडिलांचे नाव तमाशाच्या इतिहासात कोरले जाओ. हीच ईश्वरा चरणी प्रार्थना...

लेखक. 

शाहीर खंदारे. 

ता.नेवासा. 

मो.8605558432

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने