*शिंदखेडा येथील श्री स्वामी समर्थ उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी चा शंभर टक्के निकाल -निकीता पाटील प्रथम , तर गुंजन गिरनार* *द्वितीय -* *यशाची परंपरा कायम* शिंदखेडा(प्रतिनिधी यादवराव सावंत ):- श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिंदखेडा इयत्ता 12 वी च्या 100 % निकालाच्या यशाची परंपरा कायम. विद्यालयातुन 73 विद्यार्थी एच एस सी परीक्षा 2021मध्ये प्रविष्ठ होते. कोरोना काळात सदर विद्यार्थ्यांना विषय शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापन करून विद्यार्थ्यांना सहकार्य केले त्यात कु. पाटील निकिता प्रशांत 87.33% गुण मिळवुन शाळेत प्रथम क्रमांक व कु.गिरनार गुंजन अशोक 87.17%
द्वितीय क्रमांक व कु.पाटील ऋतुजा राजेश 86.67% तृतीय क्रमांक आणि कु.देवरे प्रिती राजेंद्र 86.00% गुण मिळून चतुर्थ क्रमांक मिळवला प्रविष्ठ विद्यार्थ्यांन पैकी 73 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले .सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा डॉ.आर. आर .पाटील , उज्वल पाटील , अनिल पाटील , सुरेश पाटील कॉलेज चे प्राचार्य श्री. एम .डी .पाटील तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणा साठी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या