*पाच वर्षाच्या मुलीने केला..बापाला वाचविण्याचा प्रयत्न.. अखेर जे व्हायला नव्हते तेच झाले..*

 *पाच वर्षाच्या मुलीने केला..बापाला वाचविण्याचा प्रयत्न.. अखेर जे व्हायला नव्हते तेच झाले..* 



जळगाव दि.०४: तालुक्यातील चिंचोली येथील 35 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. गणेश शिवाजी गोसावी (35) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश गोसावी हा पत्नी व दोन मुलांसह चिंचोली येथे वास्तव्यास होते. मंगळवार, 3 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता सर्वजण जेवण करून झोपले असता गणेश यांनी रात्री 10.30 वाजता त्यांनी राहत्या घरात साडीने गळफास घेतो. ही बाब त्यांची 5 वर्षाची मुलगी परी हिच्या लक्षात आल्याने घटना उघडकीस आली. नातेवाईकांनी तातडीने त्यांना खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. तपास पोलीस नाईक रतीलाल पवार करीत आहे. मयताच्या पश्चात आई मंगलाबाई, वडील शिवाजी प्रल्हाद गोसावी, पिंटू व सोनू हे दोन भाऊ, पत्नी गुड्डी, मुलगी परी आणि 4 वर्षाचा मुलगा सोम असा परीवार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने