नंदुरबार जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाचा भोंगळ कारभार.. दूरध्वनी क्रमांक बंद.. आदिवासींची ससेहोलपट..२००कि.मी. अंतर* *कापून येणाऱ्यांची वापसी म्हणजे थट्टा चालवलीयं का? नागरिकांचा सवाल.. बंद फोनची ट्रिंग ट्रिंग..बेल वाजून द्या.. एव्हढीच मागणी*

 



*नंदुरबार जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाचा भोंगळ कारभार.. दूरध्वनी क्रमांक बंद.. आदिवासींची ससेहोलपट..२००कि.मी. अंतर* *कापून येणाऱ्यांची वापसी म्हणजे थट्टा चालवलीयं का? नागरिकांचा सवाल.. बंद फोनची  ट्रिंग ट्रिंग..बेल वाजून द्या.. एव्हढीच मागणी* 


शिंदखेडा दि.०४ (प्रतिनिधी रवि शिरसाठ)नंदुरबार येथील अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाचा भोंगळ कारभारामुळे विभागातील न्यायग्रस्त व्यक्तींना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते आहे. २००ते२५० कि.मी. अंतर कापून भुकेला तहानलेल्या आलेल्या व्यक्तीस खाली हात वापस जावे लागण्याचा प्रकार अधिक वाढीस लागला आहे. या सर्वांचे मुळ कारणं आहे.ते या कार्यालयातील बंद असलेला दूरध्वनी.या कार्यालयातील दिलेला संपर्क नंबर गेल्या तीन-चार महिन्यांपासून"ये नंबर मौजुद नहीं.. चेक द नंबर.. एव्हढाच संदेश ऐकायला मिळत असल्याने लांब पल्ल्याच्या रहिवाशांना कार्यालयात पोहोचताच तुम्हाला बोलविले नसल्याचे सांगण्यात येते..तीन तासांचा प्रवास करत आलेल्या व्यक्तीस असे वाक्यं कानावर येताच गर्भगळीत झाल्यासारखे वाटते..हा प्रकार म्हणजे माणसाची इथे थट्टामस्करी चाललीय का? असं वाटायला लागतं.या गंभीर प्रकाराकडे मात्र कार्यालय प्रमुखांकडून सोयिस्करपणे दूर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांनामध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.तरी याप्रकरणी पुणे आयुक्तांनी किंवा नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी तोबडतोब लक्ष घालून या कार्यालयातील बंद फोन त्वरीत सुरू करण्याचे आदेश देऊन नागरिकांची हेडसांड थांबवावी अशी मागणी होत आहे.

नंदुरबार जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात जात दाव्याची सुनावणी कामीं खान्देशातून मोठ्या प्रमाणात याचिकाकर्ते येत असताना.यात जळगाव, फैजपूर,एदलाबाद,यावल, चोपडा, रावेर या लांब पल्ल्याच्या भागातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात येत असतात .या भागातील रहिवासींना येण्या-जाण्यासाठी वाहनांची वेळ अनिश्चित असते.त्यांना पोहचायला प्रचंड त्रास होत असतो.त्याची हेअरिंग तारखेला सुनावणी होईलच याची शाश्वती नसते.त्यामुळे कार्यालयातील फोन क्रमांक.(०२५६४)-२१०१३०हा त्वरीत सुरू केल्यास अनेकांची होणारी गैरसोय सोय थांबणार आहे.याप्रकरणी अनेकांनी तोंडी तक्रार करून कुठल्याही दखल घेतली जात नाही तरी वरिष्ठ पातळीवर लक्ष घालून जनतेची गैरसोय टाळावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने