*रेल्वे स्थानक स्वच्छतेसाठी ठिकठिकाणी फलक लावणार,* *रेल्वे प्रवासी संघटनेची बैठकीत निर्णय**

 



**रेल्वे स्थानक स्वच्छतेसाठी  ठिकठिकाणी फलक लावणार,* 

 *रेल्वे प्रवासी संघटनेची बैठकीत निर्णय** 


नाशिक दि.०४(संजय शिंदे):

नाशिकरोड | रेल्वेचे मासिक पासधारक, प्रवासी वेल्फेअर असोशिएशनची बैठक संपन्न झाली. यावेळी रेल्वेने दररोज प्रवास करणारे प्रवासी हे एका कुंटूबातील सदस्य बनले असून प्रत्येकाच्या संकटांमध्ये धावून येतात. तसेच सर्व रेल्वेगाड्यांमध्ये स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर शुध्द पाणी उपलब्ध होणे, दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध होण्यासाठी रेल्वे प्रशासनासोबत वांरवार चर्चा करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजेश फोकणे यांनी सांगितले. किरण बोरसे यांनी रेल्वे स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावणे, तसेच प्रवाशांना वैद्यकिय सुविधा देण्यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न केला जाणार असल्याचे नमूद केले. यावेळी संघटनेचे सल्लागार माजी आमदार योगेश घोलप, कैलास बर्वे, संजय शिंदे, सुदाम शिंदे, दिपक कोरगावकर, नितीन चिडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने