*आश्चर्यम् ..!! एक..नाही.. दोन..नाही..! चक्क तीनं बाळांना दिला जन्म..ती भाग्यशाली माता अगदी ठणठणीत आहे...तेही सिझर न होता..*
रावेर:दि.०४(प्रतिनिधी): रावेर येथील रहिवासी अमरीन बी शेख मुस्तकीन (वय २२) या महिलेने माऊली हॉस्पीटलमध्ये तीळ्यांना जन्म दिला. डॉक्टरांच्या प्रयत्नाने नॉर्मल प्रसूती करण्यात आली असून, | तीघ मुलांसह मातेची तब्येत चांगली ठणठणीतआहे.
शहरातील मन्यारवाडा भागातील रहिवासी अमरीन बी शेख मुस्तकीन या महिलेस प्रसूतीवेदना जाणवू लागल्याने माऊली हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. संबंधीत महिलेची प्रकृती बघता नॉर्मल प्रसूती होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. मात्र डॉ. संदीप पाटील यांनी त्यांच्या वैदकीय ज्ञानासह अनुभवाच्या आधारे उपचार करून संबंधीत रूग्णाच्या नातेवाईकांना धीर देत, अमरीनची नॉर्मल प्रसूती केली. तिने तिळ्यांना जन्म दिला. जन्मलेली तिन्ही बाळ मुले असून त्यांची प्रकृती चांगली आहे. तिळ्यांना जन्म दिल्याचे माहित होताच रूग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती, तिचं बाळांसह आईची तब्येत चांगली असल्याने सर्वत्र आनंदाची लहर पसरली आहे