*गोरगावले रस्त्यालगत नवीन डीपी मंजुर.. वीज खंडित होण्याचे प्रमाण होणार कमी.. नगरसेवक किशोर चौधरी यांच्या प्रयत्नांना यश.. आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे ह्यांनी केला "प्राब्लेम साॅल"*
चोपडा दि.२७ (प्रतिनिधी); शहरातील गोरगावले रस्त्यालगत असलेल्या विद्युत वितरण कंपनी च्या फिडरवर अतिरिक्त वीज पुरवठा लोड होत असल्याने विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते हे गांभीर्याने लक्षात घेऊन नगरसेवक किशोर चौधरी यांनी आ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून नवीन डीपी मंजुर घेतल्याने परिसरातील विजेचा प्रश्न मिटल्याने काॅलनीवासियांत आनंद व्यक्त केला जात आहे
चोपडा शहरात लागत गोरगावले रोडवरील घुमावल फिडरवरिल पुंडलिक मंगा डीपी वर अतिरिक्त विजेचा भार येत असल्याने वारंवार वीज खंडित होत होती यावर उपपययोजना होण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीवर नगरसेवक किशोर चौधरी यांनी आमदार लताताई सोनवणे यांच्याकडे समस्या मांडली असता त्वरित यासाठी 63 के.व्ही.डीपी वर 100 के.व्ही.ची डीपी बसविण्यासाठी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र वीज वितरण, धरणगाव यांना पुढील कार्यवाहीसाठी पत्र देण्यात आले