जळगाव पंचायत समितीच्या नवनियुक्त सभापती सौ. ललिताबाई कोळी* यांचा सत्कार ..साडी चोळी शाल पुष्पगुच्छ देऊन केला गौरव






जळगाव पंचायत समितीच्या नवनियुक्त सभापती सौ. ललिताबाई कोळी* यांचा सत्कार ..साडी चोळी शाल पुष्पगुच्छ देऊन केला गौरव


जळगाव दि.२८(प्रतिनिधी) आज दिनांक *27 जुलै 2021 मंगळवार रोजी* जळगाव पंचायत समितीच्या नवनियुक्त *पंचायत समिती सभापती माननीय सौ. ललिताबाई कोळी* यांचा सत्कार साडी चोळी शाल पुष्पगुच्छ देऊन कानळदा ग्रामपंचायतीचे *सरपंच श्री.पुंडलिक सपकाळे साहेब* ( सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक) यांच्या कानळदा येथील *"मातोश्री" बंगल्यावर* आयोजित करण्यात आला. यावेळी सभापती ललिता ताई कोळी यांचे पती *श्री.जनार्दन कोळी (जना आप्पा)* तसेच सभापतींचे स्वीय सहाय्यक *श्री.लक्ष्मण सपकाळे सर* यांचाही शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमासाठी गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच व सन्माननीय सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांसह तरुण कार्यकर्तेही हजर होते.उपस्थितांमधून *सरपंच बापूसाहेब पुंडलिक सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य श्री जगदीश सपकाळे,भैय्यासाहेब चव्हाण, यांचेसह मान्यवरांनी* आपापले मनोगत व्यक्त केले.आदरणीय *सभापती ताईंनी शासनाच्या योजनांविषयी उपस्थितांना माहिती देत विविध योजना आपल्या कार्यकाळात राबवल्या जातील* असे स्पष्ट करून कार्यक्रम आयोजनासाठी सरपंच बापूसाहेब पुंडलिक सपकाळे यांचे ऋणनिर्देश केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *ग्रामपंचायत सदस्य किशोर सपकाळे* व आभार प्रदर्शन *कर्तव्य ग्रुपचे उपाध्यक्ष जितेंद्र भाऊ सपकाळे* यांनी केले. फराळ व चहा पाना नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सभापती ताई यांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.*तरुण कार्यकर्त्यांनी कार्यक्रम आयोजनासाठी मेहनत घेतली.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने