*सौ.सुजाता उर्फ वर्षा प्रविणकुमार बाविस्कर यांचा चोपडा तालुका गोरगावले केंद्रात सत्कार*




 *सौ.सुजाता उर्फ वर्षा प्रविणकुमार बाविस्कर यांचा चोपडा तालुका गोरगावले केंद्रात  सत्कार*


     चोपडा दि.२८(प्रतिनिधी)  दिनांक २७ जुलै २०२१ रोजी चोपडा तालुका गोरगावले बु|| येथे मुख्याध्यापक  सहविचार सभा  आयोजित करण्यात आली होती या सभेत जि.प.मराठी मुलांची शाळा वडगाव खुर्द  येथील मुख्याध्यापिका सौ.सुजाता उर्फ वर्षाताई प्रविणकुमार बाविस्कर यांची नुकतीच मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट, नवी दिल्ली च्या जळगाव जिल्हा महीला सल्लागार पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

        यावेळी गोरगावले केंद्रातील जि.प.मराठी शाळांचे मुख्याध्यापक हजर होते,गोरगावले केंद्राकडून  श्रीमती रत्नाताई शिरूडे यांचे हस्ते शाल,श्रीफल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मुख्याध्यापक व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

        आपल्या सत्कार प्रसंगी दोन शब्द मनोगत व्यक्त करतांना सौ.वर्षाताईंनी सर्वांचे आभार मानत वरिष्ठांचे आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली समाजात होत असलेला गोरगरीबां वरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळवून देण्यात येईल,समाजात वाढत असलेला भष्टाचार रोखणेसाठी ठोस पावले उचलण्यात येतील,महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार असून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने