गरीबांच्या शिक्षणासाठी संस्थेने काम करावे : छगन भुजबळ

 


नाशिक दि. 1(प्रतिनिधी) 

कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, नाशिकचे शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नामकरण, राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज नवीन इमारत उदघाटन आणि उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार सीमा हिरे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस नीलिमाताई पवार, अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, उपसभापती राघोनाना आहिरे, चिटणीस डॉ. सुनिल ढिकले आणि मविप्र संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. 


सत्यशोधक चळवळीचं काम या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येऊन ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ही ब्रीद वाक्य घेऊन मविप्र ही संस्था गेल्या 107 वर्षापासून समाजाला आपली सेवा देत आहे. सत्यशोधक विचारसरणीवर काम करून बहुजन समाजाची सेवा करावी. अतिशय सुंदर आणि प्रेक्षणीय असे संग्रहालय निर्माण करण्यात आलेले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने