भारती अॅक्सा कंपनीकडून टाळाटाळ.. विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकरी हैराण..*

 


चांदवड दि. 1 (प्रतिनिधी) मागिल वर्षीचांदवड तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा पिक विमा काढलेला होता त्याचे पैसे आजपर्यंत त्याशेतकऱ्यांना मिळालेले नाहीत क्रुषी विभागात याबाबत वारंवार विचारणा केली असता *भारती अँक्सा कंपनीचे अधिकाऱ्यांना संपर्क करा असे सांगण्यात येते आणि भारती अँक्सा चे नासिक जिल्हा व्यवस्थापक गेल्या सहा महिन्यापासून ऐवढेच सांगतात कि *माहिती वर पाठवलेली आहेत* आणि त्यांचे वरीष्ठ अधिकारी फोनच उचलत नाहीत असे उत्तर देऊन शेतकऱ्यांचे सांत्वन केले जाते मात्र काहीही पाऊल उचलले जात नाही. यामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे 


गेल्या सहा महीन्यापासून शेतकरी क्रुषी विभागाच्या पायऱ्या झिझवत आहेत पण कोणीही अधिकारी योग्य उत्तर देत नाहीत व पिक विम्याचे प्रश्न मार्गी लावत नाही आणि क्रुषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना यावर्षीही पिक विमा काढायला प्रेशर आणत आहेत तरी संबधीत अधिकाऱ्यांनी लक्ष शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी.होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने