*देशसेवा कर्तव्यपूर्ती पार पाडून रितेश अहिराराव उदया दि,२९ रोजी शिंदखेडा शहरात दाखल होणार*
शिदखेडा (तालुका प्रतिनिधी --यादवराव सावंत ) शिंदखेडा येथील रहिवासी रितेश सुदाम अहिराराव भारतीय सैन्य दलातून सतरा वर्षाच्या सेवेतुन सेवानिवृत्त होऊन आज ( २९ ) शिंदखेडा शहरात दाखल होत आहे
सन 2003- 2004 च्या काळात सैन्य दलात रितेश अहिराराव याची भरती झाली होती एकूण सतरा वर्षाचा बॉण्ड सेवेसाठी त्याचा होता देशसेवा हेच आपले ध्येय मनाशी बाळगून त्याने संकल्प केला होता घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती घराची जबाबदारीही त्याच्यावर होती तो येथील एम एच एस एस हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी होता अनेक ठिकाणी त्याने आपले कर्तव्य पार पाडले आहे सेवापूर्तीचा कार्यकाल पूर्ण करून तो आज घरी आपल्या मायभूमीत परत येत आहे हेही भाग्यच म्हणावे लागेल
रितेशने आपला कार्यकाल आसाम या ठिकाणी पूर्ण केला त्याने नवजीवन एक्स्प्रेसने प्रवासास सुरुवात केली असून तो दिनांक 29 जुलै रोजी शिंदखेडा शहरात दाखल होणार आहे सारे शिंदखेडा शहर त्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे हे मात्र निश्चित त्याचे आगमन झाल्यावर शहरात त्याची मिरवणूक आयोजित केली आहे तर दुपारी एक वाजता गर्ल्स हायस्कुल जवळील त्याच्या निवास स्थानी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे प्रसंगी त्याची आई त्याचे औक्षण करणार आहे