छावा क्रांतिवीर सेना व समस्त भूम व पाथरूडकर बांधवांतर्फे..
छत्रपती संभाजीराजे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत..हालोंडी , कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली,रुई,चंदूर जिल्हा या पूरग्रस्त भागात साहित्य वाटप
भूम/पाथरूड दि.२८ (प्रतिनिधी दिलीप पाटील): छत्रपती संभाजीराजे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देतसाहि माणुसकीचा मदतीचा एक हात व छोटासा प्रयत्न छावा क्रांतिवीर सेना व समस्त भूम व पाथरूडकर बांधवाकडून दिलेली मदत आपल्या पूरग्रस्त बंधू भगिनींना पोच केली खरच भूम आणि परिसरातील सर्व बांधवांचा खूप अभिमान वाटतो ...आज सकाळपासून हालोंडी , शिरोली,रुई,चंदूर जिल्हा कोल्हापूर या पूरग्रस्त भागात जाऊन तेथील बांधवांना प्रत्येक गावात ,तेल,तूरडाळ,पोहे,रवा,ज्वारी,गहू,तांदूळ,कोलगेट,साबण,पार्ले बिस्किटे, शेंगदाणे, साखर,चहा पावडर अशी 10 दिवस पुरेल अशी किराणा धान्य किट प्रत्येक गावात 100 किट प्रमाणे सुपूर्द केली.. या सर्व पदाधिकाऱ्यांचे छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर प्रदेश उपाध्यक्ष बाबा रोटे प्रदेश प्रवक्ते जीवन राजे इंगळे मराठवाडा संपर्क प्रमुख अमर भाई शेख जिल्हा प्रमुख महेश गवळी यांनी विशेष कौतुक केले व आभार मानले अत्यंत चांगल्या पद्धतीने गरजू लोकांपर्यंत आपणही मदत पोहोचवली यापुढेही लवकरात लवकर आणखी मदत पूरग्रस्त भागात संघटनेच्यावतीने पोहोचवली जाईल असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले
यावेळी छावा क्रांतिवीर सेना युवक तालुका अध्यक्ष गणेश नलवडे.वि.आ. ता.अध्यक्ष अर्जुन जाधव.समाजसेवक विठ्ठल आण्णा बाराते अजय शेंडगे. महेश गुळमे.शेळके आदि उपस्थीत होते.आई जगदंबा करो हे अस्मानी संकट लवकर टळो आणि परत एखदा सर्व लोक आपल्या गावात गुण्यागोविंदाने नानंदावे हीच भवानी चरणी प्रार्थना,,, जय शिवराय