*चौगाव येथील भरत देवरे यांनी मुलीच्या वाढदिवस गरिब कुटुंबाला किराणा देऊन केला साजरा ****
चौगांव ता.चोपडा दि.२८(संदीप कोळी)*चोपडा तालुक्यातील चौगाव येथे मंगलाबाई भगवान कोळी व आनंदा भगवान कोळी हे दोघे आई आणी मुलगा हे हलाखिचे जिवन जगत आहेत.ते कुठलेही काम करु शकत नाहीत.कोणी देईल तर त्यांच्या पोटात पडेल अशी त्यांची परिस्थिती आहे. म्हणून सामाजिक कार्यकर्ते भरत देवरे यांनी त्यांच्या मुलीच्या वाढ दिवस मोठ्या थाठामाठात साजरा न करता या गरिब कुटुंबाला एक महिन्याचा किराणा करुन दिला*
*भरत देवरे हे सामजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात.याआधी देखील भरत देवरे यांनी याच कुटुंबाला एक महिन्याचा किराणा करुन दिला होता.भरत देवरे हे जात,पात, धर्म न बघता कुठलाही भेदभाव न करता सामजिक कार्य करित असतात.हा किराणा संदीप कोळी पत्रकार तथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे चोपडा तालुका प्रसिद्दि प्रमुख यांच्या उपस्थितीत दिला आहे.