*निश्चित ध्येयाने आणि विकासाच्या विचाराने वाटचाल करणारे नेतृत्व मा. संदीप दादा बेडसे*..मौजे देगांव येथे विकासकामांचे भूमिपूजन संपन्न*
*शिंदखेडादि.२७ (तालुका ग्रामीण प्रतिनिधी:- रविंद्र शिरसाठ*)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा विधानसभेतील 30 गावांमधील विकासकामांचा शुभारंभ काल धावडे येथून करण्यात आला. शुभारंभ कामाच्या रुपरेषेप्रमाणे *देगांव* येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्ह्याचे कार्यसम्राट नेते मा. संदिप दादा बेडसे यांच्या हस्ते श्रीफळ वाहून *25:15 योजनेअंतर्गत सिमेंट-काँक्रीट रस्त्यांच्या विकासकामास* सुरूवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. सत्यजित उदय सिसोदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. मयुर बोरसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे, शिंदखेडा शहराध्यक्ष श्री. प्रविण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. दुर्गेश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. चिराग माळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटक दर्पन पवार, श्री. केतन बाबा भदाणे तसेच देगाव परिसराचे युवानेते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. कमलाकर बागले,
देगांवचे सरपंच खंडा बापूजी भिल, दिपक रजेसिंग गिरासे, उपसरपंच पिंटु शंकर पाटील, माजी सरपंच अभिमन कोळी, माजी सरपंच गिरधर पाटील, ग्रा.पं.सदस्य न्हानभाउ कोळी, गांगेश्वर महीरे, अमृत महीरे, नरेंद्र गिरासे, मोघेसिंग गिरासे, राहुल कोळी, रविंद्र पाटील, गोकुळ कोळी, नितीन कोळी, जगदिश बागले, अहमद कुरेशी, गणेश कोळी, योगेश पाटील, संदीप पाटील, संदीप बागुल, कल्याण राजपूत, दिपक कोळी, खुमानसिंह गिरासे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.