" नाशिक - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली दि . २५ जून रोजी रात्री ९ वाजता संघटना मार्फत होणाऱ्या दि. २ जुलै रोजीच्या संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका स्तरावर लाक्षणिक उपोषण नियोजन व आढावा याकरिता सर्व आघाडीचे विभागीय अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष यांची बैठक आयोजित करण्यात आली. सदर झूम सभेला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, प्रदेश महासचिव डॉ. भूषण कर्डिले, उपाध्यक्ष संजय विभूते, सचिव बळवंत मोरघडे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या बैठकीत सेवा आघाडी राज्य अध्यक्ष सुभाष पन्हाळे , समन्वयक सुनिल चौधरी , युवा आघाडीचे प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, उपाध्यक्ष विपिन पिसे , जगदीश वैद्य हेही सहभागी झाले. सुमारे ३ तास चाललेल्या या झूम बैठकीची मर्यादा संख्या पूर्ण झाल्याने अनेक पदाधिकारी यांना बैठकीपासून वंचित रहावे लागले . प्रास्ताविकात विभागीय अध्यक्ष सुनिल चौधरी म्हणाले की , जो पर्यंत राज्य सरकार डेटा सुप्रिम कोर्टात सादर करत नाही तोपर्यंत ओबीसीच्या राजकीय आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे . त्यातच पोटनिवडणूका लागल्याने आपल्या जखमेवर मिठ चोळले गेले आहे . या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला जिल्हा व तालुकास्तरावर एकाच वेळी निवेदन द्यावयाचे आहे . आपली संघटना कोणत्याही पक्षाची बांधील नाही . आपल्या खास शैलीत व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करताना प्रदेश महासचिव डॉ . भूषण कर्डिले म्हणाले की , ओबीसी वर झालेल्या अन्याय मुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे . ही लढाई एका दिवसाची नसून जो पर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपणास भविष्यात लढाये लागेल . आपल्या प्रमुख मागण्या राज्य सरकारने ताबडतोब इम्पीरियरल डाटा सुप्रीम कोर्टात सादर करावा . केन्द्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी . संपूर्ण मंडल आयोग लागू करावा. यासाठी आपल्या लढा उभारायचा आहे. *अभी नहीं तो कभी नही* .... *महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यात एकाच वेळी एकाच दिवशी म्हणजे दि . २ जुलै ११ ते ४ वाजता काळ्या फिती व काळे मास्क लावून जिल्हा स्तरावर म , जिल्हाधिकारी व तालुकास्तरावर तहसिलदार यांना निवेदन देवून लाक्षणिक उपोषण करावयाचे आहे . ३५० निवेदेन एकाच दिवशी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने मुख्यमंत्रीसाहेबांना रोज होणाऱ्या माहितीत त्याची दखल घ्यावीच लागेल.* निवेदनाचा मजकूर व मार्गदर्शक सुचना आपल्यापर्यंत पोहोचविल्या जातील , आपल्याला सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेटावयाचे आहे त्यांची वेळ घेण्याचे आपले प्रयत्न सुरु आहेत . आपल्या कोणत्याही पक्षासाठी काही करायचे नाही तर समाजासाठी करावयाचे आहे सुप्रिम कोर्टाला ओबीसीचा डेटा सादर न केल्याने पोटनिवडणूका लागल्या हा ओबीसीचा मुळावर घाव आहे . ओबीसीच्या हक्कासाठी लढले पाहिजे राजकारणात ओबीसींनी येवू नये म्हणून षडयंत्र आहे . ओबीसींनी राजकारणात आले पाहिजे त्याशिवाय सत्तेची चावी मिळू शकत नाही . २०११ साली झालेले यादीपेक्षा आता तीन महिन्यात २०२१ ला ओबीसीचा डाटा सुप्रिम कोटात सादर केल्यास अधिक फायदा होवू शकतो . ओबीसीचा मंडळ आयोगाच्या संपूर्ण शिफारसी लागू झाल्या पाहिजे आपल्या ओबीसी बाबतीत कोणीही येते आणि अन्याय करतो . ओबीसीवर झालेला अन्याय व धोक्यात आलेले राजकीय आरक्षण वाचवायचे आहे . संघटना कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधलेली नाही हे मी महासचिव नात्याने ठामपणे सांगतो . ही सामाजिक लढाई आपणांस लढावीच लागेल . तेली समाजाला ओबीसीतील इतर समाजाला घेवून नेतृत्व करण्याची संधी तयार झाली आहे . आपल्या समाजाच्या पुढाऱ्यांवर पहिला अधिकार तेल्याचा आहे . आमच्या लढ्यात कोणताही पक्षाचे पुढारी येवू शकतात , भाषणे करु शकतात . तुमच्या पक्षाचे जोडे समाज मंदीराबाहे काढायचे आहे . जो पक्ष आमचा न्याय / हक्क मिळवून देईल त्याला आम्ही भविष्यात ताकद देयू . ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील सुमारे ५६००० निवडणूक जागा जाणार आहेत . ओबीसी सहनशिल आहे त्यास बदलावे लागेल . लोणावळ्याच्या चिंतन बैठकीत मी व गजूनाना जाणार आहोत कोणते स्टेज आहे हे महत्वाचे नाही आपल्या मागण्या महत्वाच्या आहेत . काही आपल्यात भेद करतील त्यांना आपण ठणकावून सांगीतले पाहिजे आमचा लढा समाजासाठी आहे . किंतू परंतू जंतू मारुन टाकले पाहिजे . आम्ही घरात भांडू बाहेर मात्र एक होवून जावू , माजी मंत्री मा . चंद्रशेखर बावनकुळे - राजकीया आंदोलनाने लवकर फरक पडणार नाही पण सरकारवर समाज आंदोलनाचा लवकर फरक पडतो . आपण आपल्या संघटनेने सुरुवात केली आहे . आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही . आम्हाला निवडणूका घेण्याशिवाय पर्याय नाही असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले . या सरकारने विनंती केली तर निवडणूका थांबू शकतात . डेल्टा प्लस , कोरोनाचे कारण आहेच.सुप्रिम कोर्टात स्टे मिळविण्यासाठी प्रयत्न राज्य सरकारने केला पाहिजे.तीन महिन्यात डेटा तयार करता येवू शकतो एका ग्रामपंचायतने तीन दिवसात डेटा पूर्ण केला . पण हे सरकार व यातील काही झारीतील शुक्राचार्य डिसेंबर २०२२ पर्यंत डेटा तयार करण्याच्या मानसिकतेत नाही कारण तोपर्यंत ९ ० टक्के स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूका पार पडणार आहेत ओबीसीच्या जागेवर डल्ला मारता येईल , कोर्टाने स्पष्टपणे सांगीतले डेटा तयार करुन पाठवा आणि त्यानुसार आरक्षण द्या पण १५ महिने वेळ वाया घालाविला . मंत्री ना . विजय वडेट्टीवार साहेब चांगले काम करतात पण त्यांना त्यांच्या सरकारमधील लोक काम करा देत नाही . पुढच्या तीन महिन्यात पुढेही आदोलन जिवत ठेवावे लागेल . ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसू नये आपण लढा लढू निश्चीत लढाई जिंकू . आपल्या संघटनेने चांगले काम केले ओबीसीसाठी आवाज उठविला . कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार - डॉ भूषण कर्डिले यांनी चांगले मार्गदर्शन केले . बावनकुळे साहेबांनी अतिशय मुद्देसुट सांगीतले . अतिशय सोपी गोष्ट आहे कोर्टाने सांगीतल्याप्रमाणे राज्य सरकारने डाटा द्यावा इतके साधी गोष्ट आहे . अनेक जण माहिती वरुन बोलतात पण डॉ . भूषण कर्डिले व बावनकुळेसाहेब पुराव्यानिशी बोलतात . कोटाने सांगीतल्याप्रमाणे राज्य सरकारने डाटा द्यावा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची भूमिका स्पष्ट असली पाहिजे.आज राजकीय आरक्षण घालविले उद्या शिक्षण नंतर नोकरीवर घालवतिल . त्यामुळे तेली समाजाने नेतृत्व करीत हा लढा लढावा . त्यासाठी सर्व कामे सोडून वेळ द्यावा . धरणे आंदोलन / उपोषणला बसले पाहिजे . पदाधिकारी यांनी केलेल्या आंदोलनाचे फोटो व माहिती तात्काळ डॉ . 1. भूषण कर्डिले व सुनिल चौधरी यांच्याकडे पाठवावी , आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजे . तरच तेली समाज जागरुक आहे हे निश्चीत होईल , ओबीसीचा डाटा तीन महिन्यात का होवू शकत नाही . झारीतील शुक्राचार्याचे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे . जागरुक राहिले पाहिजे . उपोषण पहिली नादी आहे पुढच्या काळात लढाई थाबणार नाही . एक तेली , कोटी तेली ... एक ओबीसी , कोटी ओबीसी..ही भूमिका घ्यावी . सर्व पक्षाच्या ओबीसी घटकांनी आदोलनात आपला सहभाग नोंदविला पाहिजे . संघर्षात उतरले पाहिजे . २ तारखेचे आंदोलन / उपोषण मोठ्या ताकदीने झाले पाहिजे काळे झेंडे , काळे मास्क , काळे रिबीन लावा दबाव टाकल्याशिवाय मागण्या मान्य होणार नाही . सर्व पक्षीय नेत्यांना आपण निवेदन देवू . ३४० ओबीसींना लागू झाला पाहिजे , आमचा पक्ष तेली / संताजी एवढाच असला पाहिजे . संजय भाऊ विभूते - डॉ . भूषण कर्डिले यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो . समाज अगोदर पक्ष गट तट बघायचे नाही तर आपणास तेली समाजाचा प्रामाणिकपणाने काम करायचे , समाजाला न्याय कसा देता येईल . अडीअडचणी कश्या दूर करता येतील . खासदार रामदास तडससाहेब , मंत्री ना . विजय वडेट्टीवारसाहेब , माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , डॉ . भूषण कर्डिले , गजानन नाना शेलार , अशोक काका व्यवहारे , आ . संदीप क्षिरसारण सारखे मजबूल नेतृत्व लाभले आहे . समाज संघटीत करताना फार त्रास झाला आता रस्त्यावरची ही लढाई आपल्याला रस्त्यावर ताकदीने लढावी लागेल , पूर्ण देशातसंदेश गेला पाहिजे आपल्या मागण्यासाठी तेली समाज गल्ली बोळातून घराघरातून बाहेर पडला पाहिजे . आपल्या हक्कासाठी पेटून उठले पाहिजे . मी पक्ष नेतृत्वास सांगू इच्छितो की , आपण आदेश दिला तर मी माझा राजीनामा संघटनेसाठी देईल . दिपक राऊत - चांगल्या विषयावर संघटनेने हात घातला आहे . सारथी बार्टी सारखा आपल्य हुशार मुलांसाठी आपणास एक रुपयाही आणता आलेला नाही . समाजाचा वापर निवडणूका पुरता न होता समाजाच्या हितासाठी व्हावा , प्रशांत इखेर डॉ . भूषण कर्डिले यांचे अभिनंदन करतो . आपल्या मागण्यांसाठी पंतप्रधान , राष्ट्रपती यांना भेटावे . तसेच प्रयत्न करावेत . निलेश शंकपाळ - ओबीसीची समन्वय समिती तयार करावी , यजमुठ बांधावी , शिकलो आहोत , संघटीत आहोत आता संघर्ष करावा . सुषमाताई राऊत -राजकीयांची ही खेळी खेळली ओबीसी ही तर कत्तल आहे . महिलांनी जास्तीत जास्त संख्येने आदोलनात उतरावे . आम्हांस आदेश करा आम्ही बुलढाण्यात लद्र अमोल आगाशे - कॉमन कार्यक्रम द्यावा , शेवटच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावी . रमेश अकोटकर - चिंतन बैठकीत डॉ . भूषण कर्डिले यांनी ठासून ठणकावून स्पष्टपणे आपली भूमिका मांडावी . सतिष वैरागी - भावी पिढी आपणास माफ करणार नाही . सर्वांनी एकत्र येवून लढा लढावा . निवेदन मजकूर गाईडलाईन लवकर मिळाव्यात , प्रफुल खानविलकर - आपल्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत लढा चालवित ठेवावा .
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ओबीसी न्याय हक्कासाठी दि . २ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका स्तरावर लाक्षणिक उपोषण करणार -डॉ . भूषण कर्डिले
Zatpat Polkhol News
0
Zatpat Polkhol News
खानदेशातील वाचकाचे चाहते वृत्तपत्र *"दैनिक जनशक्ती*" या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून 15 वर्षाच्या कारकीर्दीत समाज हिताचे लिखाण करून अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपुर्ण योगदान दिले आहे. वृत्तपत्र क्षेत्रात जाहिरात, बातम्या सर्वच विभागात कामाची हातोटी असल्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे राजकीय. सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय देऊन निस्वार्थी, निगर्वीपणे पुढे आलो आहे. शिवाय साप्ताहिक चौखंबा वृत्तपत्राचे उपसंपादक म्हणून काम केले आहे. "दिवाळी विशेषांक" खास शैलीत काढले आहेत. महाराष्ट्र 99 न्यूज चॅनेलचे उपसंपादक म्हणून कामगिरी बजावली आहे. आदिवासी, दिव्यांग दीन-दलित व वंचित समाज गोर गरिबांची सेवा अविरतपणे बजावित आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून जनतेला सेवा देण्यासाठी तत्पर आहे. भ्रष्टाचार, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी *"झटपट पोलखोल न्यूज"* लेखणी सुरूवात केली आहे.
भविष्यात सर्व सामान्य गोर गरिब व वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपुर्ण योगदान देणार असून अन्याय व भ्रष्टाचार विरोधी धारदार लेखनीने आवाज उठवून न्याय देण्यासाठी झिजणार आहोत. ग्रामीण भागातील विद्यार्थी, लोकांपर्यंत पोहोचून शासन योजना पोहचविण्याची मोलाची जबाबदारी पार पाडून जन जागृती अभियान राबविणार आहोत