दोंडाईचा ( दि.२७/६/२०२१) महावीर दाल आणि आँईल मिल यांच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स , जवाहर मेडीकल फाऊंडेशन संचलीत ऐ.सी.पी.एम.डेन्टल काँलेज धुळे व डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ डेन्टीस्ट्री धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत दंतचिकित्सा शिबिर दि.३० जुन बुधवार रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळात रोटरी भवन रोटरी मार्ग दोंडाईचा येथे आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरात दंत रुग्णांची तपासणी ऐ.सी.पी.एम.काँलेजचे प्राचार्य डॉ अरुण दोडामनी , त्यांचे प्रमुख दंतरोग चिकीत्सा तज्ञ व सर्व कर्मचारी उपस्थित राहुन गरजु रुग्णांची दंतरोग चिकीत्सा करुन आवश्यकतेनुसार दात स्वच्छ करणे, दातांमधिल गँप भरणे, तसेच शक्य असेल तर रुट कँनलची सुरुवात करणे इ आजारांवर मोफत दंतचिकित्सा करुन इलाज केला जाईल.
कोविडच्या ससंर्गांनतंर दातांना होणारा दुर्धर म्युकोर मायकोसिस ह्या आजाराची तपासणी करुन निदान करण्यात येईल तसेच म्युकोर मायकोसिस असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया अत्यंत माफक दरात जवाहर फाऊडेंशन धुळे येथे करण्यात येईल तरी दोंडाईचा शहर व परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया ,सचिव राजेश माखिजा , महावीर दाल आणि आँईल मिलचे संचालक सुरेश जैन ,प्रो चेअरमन प्रविण महाजन , रविंद्र पाटील , इ सदस्यांनी केले आहे.