ठाणे :- दि/27 ( प्रतिनिधि )
राष्ट्रीय छावा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश ऊपाध्यक्ष योगेशभाऊ पवार यांनी सोशल मिडियावरुन दिनांक २६ रोजी राज्यपालांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानूसार, त्यांनी मुंबईकडे धाव घेतली. सोलापूर पोलिस प्रशासनाकडून त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरु होती. परंतू, त्यांनी फोन स्विच ऑफ केल्याने पोलिस प्रशासनाची तारांबळ ऊडाली. सदरील माहिती जिल्हा पोलिसांकडून मलबार हिल पोलिस ठाण्याला देण्यात आली होती. त्यानूसार, अनुचित प्रकाराची घटना टाळण्यासाठी परिसरात योगेश पवार यांची ओळख पटण्यासाठी सोलापूर पोलिसांना मुंबईला जावे लागले.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने आणि केंद्र व राज्य सरकार मराठ्यांना शिक्षण, नोकरीत कोणतीही सवलत देत नसल्यामुळे माझे मानसिक आरोग्य ढासळले असून गेल्या दीड महिन्यापासून मी मानसिक तणावात आहे. मराठ्यांची हलाखीची परिस्थिती सहन होत नसल्याने मानसिक तणावातून व नैराश्यातून मी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला होता.
आत्मदहनाचा ईशारा दिल्यानंतर राजभवना समोर पोलिस तैनात होते. योगेश पवार यांच्या ओळखीसाठी सोलापूर हून काही पोलीस मुंबईत दाखल झाले होते. यावेळेस नियोजीत आत्मदहन करण्यासाठी योगेश पवार गेले असता राजभवन पोलिसांनी त्यांना अटकाव करत ताब्यात घेतले. त्यांच्या सोबत असलेले राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निखिलदादा गोळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा धाराशिव जिल्हाध्यक्ष विश्वनाथ चुंगे, अमर सुपे, प्रसाद जाधव, नितेश दातखिळे , आजीनाथ परांडकर , ओंकार लोखंडे , दत्ता ओहाळ , नितेश जाधव , संजय फुलारे , गणेश जाधव, सिद्धेश मिश्रा यांनाही पोलिसांनी ताब्यात घेत मलबार हिल पोलिस ठाण्यात जाबजवाब नोंदविले. आत्मदहनाचा पर्याय न निवडता राज्य शासनाच्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना याबाबत कळवून चर्चा घडवून आणणार असल्याचे पोलिस प्रशासनाने कळविले.