मयत देवाच्या पत्नीस.. गोळा करून दिले दीड लाख रुपये.. मदतगारांचे माझेवर लयं उपकार कविता गिरासेंचे बोलबच्न.. ना. रावल यांचे हस्ते संकलन निधी प्रदान

 *



शिंदखेडा

 दि.* 29(प्रतिनिधी) तामथरे येथील सामाजिक कार्यकर्ते कै.रामकृष्ण चंद्रसींग गिरासे उर्फ देवा रावसाहेब यांचे दोन वर्षांपूर्वी रुदय विकाराच्या तीव्र झट्क्याने आकस्मात निधन झाले होते.त्यांच्या पत्नी,मुलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून तामथरे येथील ग्रामस्थांनी व चिमठाणे गटाचे जिल्हा परिषद सदस्य विरेंद्रसिंग इंद्रसिंग गिरासे यांच्या मदतीने सुमारे 1लाख,50 हजार रुपयेची मदत गोळा करून शिंदखेड़ाचे आमदार तथा माजी मंत्री मा.श्री.जयकुमार भाऊ रावल यांचे हस्ते देवा रावसाहेब यांच्या पत्नी श्रीमती कविता रामकृष्ण गिरासे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मा.गटनेते कामराज भाऊसाहेब निकम,जिल्हा परिषद सदस्य विरेंद्रसिंग गिरासे,स्वीय सहाय्यक रामकृष्ण मोरे,शेवाडे माझी सरपंच रणजीत गिरासे, तामथरे येथील सरपंच योगेंद्रसिंग गिरासे,उपसरपंच संजीव चौधरी,ग्रामपंचायत सदस्य विजयसिंग गिरासे,मनोहर चौधरी,कोमलसिंग गिरासे,संजय धिवरे,स्वप्निल वाणी,सुरेश सोनवणे,विमलबाई भिल,सामाजिक कार्यकर्ते रवी आबा गिरासे,रामभाऊ गायकवाड,रविंद्र गिरासे असे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने