*अक्कडसे - दि.29 (रावसाहेब सैंदाणे)* शासनाच्या कृषी विभागाकडून २१ जून ते १ जुलै पर्यंत कृषी संजीवनी मोहीम राबविली जात आहे या कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया , जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, कापूस एक गाव एक वान तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल अभियान, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड महत्त्वाच्या पिकांचे कीड व रोगांचा नियंत्रण उपाययोजना व शेवटच्या दिवशी म्हणजे १ जुलैला कृषी दिन साजरा होणार आहे मौजे अक्कडसे येथे मंगळवार दिनांक २९/६/२०२१रोजी कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत तालुका कृषी अधिकारी श्री विनय बोरसे यांनी उपस्थित शेतकर्यांना बीबीएफ तंत्रज्ञान पेरणी व बीजप्रक्रिया रासायनिक खतांचा संतुलित वापर कापूस व मका पिकाचे लागवडीपासून ते काढणीपर्यंतची सर्व तंत्रज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगितले तसेच शेतकरी यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले तसेच मंडळ कृषी अधिकारी श्रीमंती लालन राजपूत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले व श्री रावसाहेब सैंदाणे यांनी सर्वांचे आभार मानले सदर कार्यक्रमास श्रीमती प्रतिभा बागुल सरपंच, जी बी महाले कृषी पर्यवेक्षक श्री सी पी भदाणे श्री एम बि सोनवणे व एन आर पाटील कृषि सहाय्य क तसेच कृषिमित्र व प्रगतिशील शेतकरी आदी उपस्थित होते